Safest cars in India: कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्स खूप महत्वाचे असतात. हल्ली लोकांकडून वाहनांमध्ये अधिकाधिक सेफ्टी फीचर्सची मागणी केली जात आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या देखील वाहनांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेऊ लागल्या आहेत. कारच्या स्टाइल आणि पॉवरसोबतच आता कारच्या सेफ्टी फीचर्सवरही खास लक्ष देण्यात येत आहे. नव्या तंत्रासोबत कार्समध्ये नवीन सेफ्टी फीचर्स दिले जात आहेत. तुम्हीही अशा कारच्या शोधात आहात का, ज्यामध्ये तुम्हाला मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील? त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक-दोन नव्हे तर ५ उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. विशेष बाब म्हणजे, या वाहनांमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग मिळणार आहेत. पाहूयात कोणत्या आहेत या कार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहा देशातल्या सर्वात सुरक्षित टॉप ५ कार

Kia Sonet

अलीकडेच, कंपनीने Kia Sonet फेसलिफ्ट भारतात लॉन्च केली आहे, या कारची सुरुवातीची किंमत ७.९९ लाख रुपये आहे या कारच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज मिळतात.

(हे ही वाचा : ‘ही’ ७ सीटर कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, १३ महिन्यांत ५० हजाराहून अधिक ग्राहकांनी केली खरेदी, किंमत…)

Hyundai Venue

Hyundai Venue ही कॉम्पॅक्ट SUV विभागातील एक लोकप्रिय SUV आहे, ज्याच्या किमती ७.९४ लाख रुपयांपासून सुरू होतात आणि त्याच्या टॉप-लेव्हल मॉडेलसाठी १३.४८ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात.

Tata Nexon

Tata Nexon ही भारतातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV वाहनांपैकी एक आहे ज्याला अलीकडेच ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तुम्ही Tata Nexon ८.१५ लाख रुपये ते १५.६० लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान खरेदी करू शकता. टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग्ज उपलब्ध होणार आहेत.

Kia Seltos

Kia Seltos ची भारतातील किंमत १०.७० लाख रुपयांपासून सुरू होते आणि २०.३० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. Kia India ने देखील अलीकडेच जाहीर केले आहे की ते सुरक्षा वैशिष्ट्ये वाढविण्यावर काम करत आहे आणि कारच्या सर्व मॉडेल्स आणि सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग ऑफर करत आहे.

Hyundai Exter

Hyundai Exeter ला नुकताच ‘इंडियन कार ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार मिळाला, कारण ही मायक्रो SUV सर्व योग्य मानकांची पूर्तता करते. Hyundai Exter त्याच्या सर्व प्रकारांमध्ये सहा एअरबॅग ऑफर करते. या कारची किंमत ६.१३ लाख ते १०.२८ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Safest cars in india with best global ncap rating in 2024 pdb