मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ४.८७ टक्क्यांनी घसरून २,७१,३५८ युनिट्सवर आली आहे. ऑटोमोबाईल डीलर्सची संस्था FADA ने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या मते, मार्च २०२१ मध्ये प्रवासी वाहनांच्या २,८५,२४० युनिट्सची विक्री झाली होती, तर मार्च २०२२ मध्ये २,७१,३५८ युनिट्सची विक्री झाली. मागील महिन्यात दुचाकींची विक्री ४.०२ टक्क्यांनी घसरून ११,५७,६८१ युनिट्सवर आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १२,०६,१९१ युनिट होती. व्यावसायिक वाहनांची विक्री १४.९१ टक्क्यांनी वाढून ७७,९३८ युनिट्स झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ६७८२८ युनिट्स होती. तीनचाकी वाहनांची विक्री देखील मार्च २०२१ मध्ये ३८,१३५ युनिट्सच्या तुलनेत २६.६१ टक्क्यांनी वाढून ४८,२८४ युनिट्सवर गेली आहे. वाहनांची एकूण विक्री २.८७ टक्क्यांनी घसरून १६,१९,१८१ युनिट्सवर गेली आहे जी मागील वर्षी याच महिन्यात १६,६६,९९६ युनिट्स होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा