गेल्या काही काळापासून कार्सची चांगली विक्री होत आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग चांगली कामगिरी करत आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत. यावर्षीही आतापर्यंत अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. पण, अशा काही कार आहेत ज्यांच्या विक्रीत जुलै महिन्यात वार्षिक आधारावर घट झाली आहे. यामध्ये मारुती बलेनो आणि टाटा नेक्सॉनसह अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कार…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलै २०२३ मध्ये ‘या’ आठ कारच्या विक्रीत घट

  • मारुती बलेनोच्या विक्रीत वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनीची घट झाली आहे. जुलै २०२३ मध्ये एकूण १६,७२५ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • मारुती डिझायरच्या विक्रीत वार्षिक आधारावर ३ टक्क्यांची घट नोंदवली गेली. जुलै २०२३ मध्ये एकूण १३,३९५ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • मारुती वॅगन आरच्या विक्रीत वार्षिक आधारावर ४३ टक्क्यांची घट झाली आहे. जुलै २०२३ मध्ये एकूण १२,९७० युनिट्सची विक्री झाली आहे.
  • टाटा नेक्सॉनच्या विक्रीत वर्षभरात १३ टक्क्यांची घट नोंदवली गेली. जुलै २०२३ मध्ये एकूण १२,३४९ युनिट्सची विक्री झाली आहे.

(हे ही वाचा : यंदाच्या रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला देऊ शकता ‘या’ पाच इलेक्ट्रिक स्कूटर्स भेट, किमती पाहा )

  • मारुती Eeco च्या विक्रीत वार्षिक आधारावर ८ टक्क्यांची घट नोंदवली गेली. जुलै २०२३ मध्ये एकूण १२,०३७ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • Hyundai Venue विक्रीत वार्षिक आधारावर १६ टक्क्यांची घट नोंदवली गेली. जुलै २०२३ मध्ये एकूण १०,०६२ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • मारुती अल्टोच्या विक्रीत वार्षिक आधारावर २२ टक्क्यांची घट झाली आहे. जुलै २०२३ मध्ये एकूण ७,०९९ युनिट्सची विक्री झाली आहे.
  • Mahindra XUV700 च्या विक्रीत वार्षिक २ टक्क्यांची घट नोंदवली गेली. जुलै २०२३ मध्ये एकूण ६,१७६ युनिट्सची विक्री झाली आहे.