Scooter Under 80 Thousand Rupees: आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न नक्की असतं की माझी स्वत:ची एक दुचाकी असावी. त्यात ती चांगली अॅव्हरेज देणारी असावी. कारण देशात गगणाला भिडणारे पेट्रोलचे दर. भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढतचं आहेत. त्यात एखादी दुचाकी घ्यायची म्हटलं तरी आपल्याला आपल्या बजेटकडे पहावे लागते. त्यातच अॅव्हरेज देणारी घ्यायची झाली तर किमान आता ८० ते ९० हजार हे मोजवे लागतात. त्यातच पहिली पसंत असते ती होंडाला कारण ती देताना चांगली किंमत येत असं म्हणतात. आता गुढी पाडवाही जवळ आला आहे, या मुहुर्तावर अनेकजण नवीन गाडी घेतात. तुम्हीही गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर स्कूटी घेण्याचा विचार करत असाल तर ८० हजार रुपयांच्या रेंजमध्ये सर्वात बेस्ट स्कूटरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
होंडा अॅक्टिव्हा
होंडा अॅक्टिव्हामध्ये 6जी मध्ये 4-स्ट्रोक एसआय इंजिन आहे. हे इंजिन 8000 आरपीएम वर ५.७७ किलोवॅट पॉवर आणि ५५०० आरपीएम वर ८.९० एनएम टॉर्क जनरेट करते. ही होंडा स्कूटर एका लिटर पेट्रोलमध्ये ४७ किलोमीटर अंतर कापण्याचा दावा करते. होंडा अॅक्टिव्हाची एक्स-शोरूम किंमत ७८६८४ रुपयांपासून सुरू होते.
हिरो प्लेजर
हिरो प्लेजर ही देखील एक चांगली स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, OHC इंजिन आहे जे ७००० आरपीएम वर ६.० किलोवॅट पॉवर आणि ५५०० आरपीएम वर ८.७ एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर एका लिटर पेट्रोलमध्ये ५० किलोमीटर अंतर कापू शकते. हिरो प्लेजरची एक्स-शोरूम किंमत ७१७६३ रुपयांपासून सुरू होते.
टीव्हीएस ज्युपिटर
टीव्हीएस ज्युपिटरमध्ये सिंगल-सिलेंडर, ४-स्ट्रोक इंजिन आहे. टीव्हीएस स्कूटरमध्ये बसवलेले हे इंजिन ५.९ किलोवॅट पॉवर आणि ९.२ एनएम टॉर्क जनरेट करते. ही दुचाकी CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. ही स्कूटर एका लिटर पेट्रोलमध्ये ५३ किलोमीटर अंतर कापते. टीव्हीएस ज्युपिटरची एक्स-शोरूम किंमत ७६६९१ रुपयांपासून सुरू होते.
ओला एस १ एक्स
इंडियात विकल्या जाणाऱ्या स्कूटरच्या लिस्टमध्ये ओला एस१एक्स चा देखील समावेश आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ७९,९९९ रुपयांपासून सुरू होते. ही ईव्ही २ किलोवॅट प्रति तास, ३ किलोवॅट प्रति तास आणि ४ किलोवॅट प्रति तास अशा तीन बॅटरी पॅक ऑप्शनसह येते. या स्कूटरचा २ किलोवॅट कॅपेसीटीचा बॅटरी पॅक जो एका चार्जिंगमध्ये ९५ किलोमीटरची रेंज देतो. या स्कूटरमध्ये ३ किलोवॅट कॅपेसीटीचा बॅटरी पॅक आहे जो १३१ किलोमीटरची रेंज देईल.४ किलोवॅट कॅपेसीटीच्या बॅटरी पॅकसह, ही स्कूटर १९३ किलोमीटरपर्यंत चालवता येते.