कार क्षेत्राच्या MPV सेक्शनमध्ये येणाऱ्या कार्सना त्यांच्या बहुउद्देशीय वापरासाठी प्राधान्य दिले जाते, ज्यामध्ये या कार्स मोठ्या कुटुंबासाठी आणि सोबत व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जातात. या सेगमेंटमध्ये आम्ही मारुती सुझुकी इकोबद्दल बोलत आहोत, जी कमी किंमत आणि मायलेजसाठी पसंत केली जाते.
जर तुम्हाला शोरूममधून मारुती इको घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ५ लाख ते ६ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण येथे नमूद केलेल्या ऑफर्सद्वारे तुम्ही ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता.
Maruti Eeco वर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री वेबसाइटवरून प्राप्त झाल्या आहेत, ज्यावरून तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सची संपूर्ण माहिती कळेल.
आणखी वाचा : Honda Cars Price Hike August 2022:होंडाच्या या गाड्या महागल्या, जाणून घ्या कोणत्या कारची किंमत वाढली?
मारुती इकोवरील पहिली ऑफर MARUTI SUZUKI TRUE VALUE वेबसाइटवरून घेतली गेली आहे. येथे या कारचे २०१० चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे या कारची किंमत १,१९,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही येथून कार खरेदी करण्यासाठी फायनान्स प्लॅन मिळवू शकता.
दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. येथे या मारुती Eeco चे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत १,२०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.
तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवर पोस्ट केली आहे. यात मारुती Eeco चे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे आणि तिची किंमत १.८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.
आणखी वाचा : BOOM CORBETT 14 ची TVS XL 100 सोबत तगडी स्पर्धा, १८० किमी रेंजचा दावा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
मारुती Eeco वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही या कारच्या इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.
Maruti Eeco मध्ये कंपनीने ११९६ cc चे १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन ७३ PS पॉवर आणि ९८ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही मारुती Eeco २०.८८ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.