टू व्हीलर सेक्टरचा स्पोर्ट्स बाइक सेगमेंट आज एक मोठी रेंज आहे. ज्यात एन्ट्री लेव्हल बाईक्स, हलके इंजिन असलेल्या बाईकपासून ते १००० cc पर्यंतच्या हेवी इंजिन बाईक्स उपलब्ध आहेत.

या सेगमेंटमधील स्पोर्ट्स बाईक्सपैकी आम्ही बजाज पल्सर NS160 बद्दल बोलत आहोत जी तिच्या स्टायलिश डिझाईन आणि वेगामुळे पसंत केली जाते.

Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

Bajaj Pulsar NS 160 ची सुरुवातीची किंमत १,२२,८५४ रुपयांपासून सुरू होते जी ऑन रोड असताना १,४७,२४२ रुपयांपर्यंत जाते. पण इथे आम्ही त्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही एवढी मोठी रक्कम खर्च न करता केवळ ४० हजार रुपयांच्या बजेटमध्ये ही बाईक खरेदी करू शकाल.

Bajaj Pulsar NS200 वरील या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची खरेदी आणि विक्री करणार्‍या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे तपशील सांगत आहोत जेणेकरून तुम्ही किमतीत चांगली बाईक खरेदी करू शकता.

आणखी वाचा : Electric Scooter Buying Guid : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा

पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर दिली आहे. या बाईकचे २०१३ चे मॉडेल येथे पोस्ट केले आहे आणि त्याची किंमत ३८,३०० रुपये ठेवण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

दुसरी ऑफर QUIKR वेबसाइटवर दिली आहे. येथे या बजाज पल्सर NS160 चे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ३६,५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकसोबत कोणतीही फायनान्स प्लॅन किंवा ऑफर येथे उपलब्ध होणार नाही.

तिसरी ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे. येथे या बजाज पल्सर NS160 चे २०१२ चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत ३५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर मिळणार नाही.

बजाज पल्सर NS 160 वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील सांगत आहोत.

आणखी वाचा : २ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Hyundai i20, जाणून घ्या ऑफर

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात १६०.३५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १७.२ PS पॉवर आणि १४.६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढच्या आणि मागील चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या ब्रेकिंग सिस्टीमसोबत सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही बजाज पल्सर NS160 बाईक ४०.६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.