भारतात जगातली सर्वात मोठी दुचाकी वाहनांची बाजारपेठ आहे. देशात दर महिन्याला लाखो बाइक्स आणि स्कूटर्सची विक्री होते. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. असं असलं तरी अनेकांचं इतकं बजेट नसतं. त्यामुळे हे ग्राहक वापरलेल्या वाहनांच्या बाजाराकडे वळतात. म्हणजेच सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून आवडती बाईक खरेदी करतात. विशेष म्हणजे, आपल्या देशात सेकेंड हँड वाहनांचा मोठा बाजार उपलब्ध आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या बाईक्स स्टायलिश डिझाइन शिवाय, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्हीही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर खालील दिलेली यादी पाहाच…

बजाज पल्सर

ही मोटरसायकल Bike Dekho वर उपलब्ध असून २०११ चे मॉडेल आहे. हे Pulsar १३५LS मॉडेल आहे ज्यामध्ये १३४.६cc चे पॉवरफुल इंजिन आहे. ही बाईक ५०००० किलोमीटर धावली असून ही फर्स्ट ऑनर बाईक आहे. ही बाईक १३.५६ पीएस पॉवर आणि हाय स्पीडसाठी ११.४Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये ६५ Kmpl मायलेज असल्याचा कंपनीचा दावा आहे. बाईकचे एकूण वजन १२१ किलो आहे. यात डिस्क ब्रेक आणि स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत. ही बाईक ३५,००० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

e cycle ferry for Mahapex 2025 exhibition in Mumbai reached Nashik Roads Head Post Office on Thursday
इ सायकल फेरीत नाशिकमधील टपाल कर्मचाऱ्यांचा सहभाग
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

बजाज CT 100

बजाज सीटी १०० ही एंट्री लेव्हल बाइक्समध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटरसायकलींपैकी एक आहे. विक्री असलेला २०१८ चा माॅडेल असून ३२००० रुपयांना उपलब्ध आहे. या उच्च मायलेज बाईकने ८५०० किमीपर्यंतचा प्रवास केला आहे. बजाज CT १०० मध्ये १०२ cc इंजिन पॉवर आहे. या बाईकला ७.७ PS पॉवर आणि हाय स्पीडसाठी ८.२४ Nm टॉर्क मिळतो. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक सहजपणे ८९.५ Kmpl मायलेज मिळवते. वजन १०९ किलोग्रॅम आहे आणि सुरक्षिततेसाठी ड्रम ब्रेक आहेत.

जुनी Honda Activa 5G स्वस्तात उपलब्ध

Honda Activa 5G ची २०१९ मॉडेल Quikr या वेबसाइटवर उपलब्ध आहे जी जुन्या दुचाकींची विक्री करते. या स्कूटरची किंमत १९,५०० रुपये आहे. स्कूटरने ८५६२ किलोमीटरचा प्रवास केला असल्याची माहिती आहे.

हे लक्षात ठेवा की, जुने वाहन खरेदी करताना त्याची कागदपत्रे नीट तपासली पाहिजेत.  वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांमध्ये वाहनाची आरसी, इन्शूरन्स तसेच सर्व्हिस रेकॉर्डचे डिटेल्स तपासून घ्या.  वाहनाचा अपघात, त्यावर काही केस प्रलंबित आहे का, विमा यासारख्या गोष्टी तपासा. गाडीच्या पार्ट्सची संपूर्ण माहिती घ्या.

Story img Loader