भारतात जगातली सर्वात मोठी दुचाकी वाहनांची बाजारपेठ आहे. देशात दर महिन्याला लाखो बाइक्स आणि स्कूटर्सची विक्री होते. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. असं असलं तरी अनेकांचं इतकं बजेट नसतं. त्यामुळे हे ग्राहक वापरलेल्या वाहनांच्या बाजाराकडे वळतात. म्हणजेच सेकेंड हँड वाहनांच्या बाजारातून आवडती बाईक खरेदी करतात. विशेष म्हणजे, आपल्या देशात सेकेंड हँड वाहनांचा मोठा बाजार उपलब्ध आहे. कमी किंमत, जबरदस्त मायलेज आणि लो मेंटनेंस असल्याने अशा बाइक्सकची खूप विक्री होते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या बाईक्स स्टायलिश डिझाइन शिवाय, कमी बजेट मध्ये चांगले आणि दमदार इंजिनसह उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्हीही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर खालील दिलेली यादी पाहाच…

बजाज पल्सर

ही मोटरसायकल Bike Dekho वर उपलब्ध असून २०११ चे मॉडेल आहे. हे Pulsar १३५LS मॉडेल आहे ज्यामध्ये १३४.६cc चे पॉवरफुल इंजिन आहे. ही बाईक ५०००० किलोमीटर धावली असून ही फर्स्ट ऑनर बाईक आहे. ही बाईक १३.५६ पीएस पॉवर आणि हाय स्पीडसाठी ११.४Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये ६५ Kmpl मायलेज असल्याचा कंपनीचा दावा आहे. बाईकचे एकूण वजन १२१ किलो आहे. यात डिस्क ब्रेक आणि स्टायलिश अलॉय व्हील्स आहेत. ही बाईक ३५,००० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand bike here are price engine features other details pdb
First published on: 03-07-2024 at 17:36 IST