तुम्हीही कार घेण्याचा विचार करत आहात आणि तुमच्याकडे पैसे कमी आहेत तर टेन्शन घेऊ नका. कारण आता तुमच्या बजेटमध्येही तुम्ही कार खरेदी करू शकता. या बातमीत आम्ही तुम्हाला वापरलेल्या कारची माहिती देत आहेत. ज्या तुम्ही सेकेंड हँड वाहनांच्या बााजारातून खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ईको सध्या भारतातील टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. दर महिन्याला या कारचे दहा-बारा हजार युनिट्स सहज विकले जातात. एकीकडे नवीन ईको मुबलक प्रमाणात विकली जात आहे, तर दुसरीकडे लोक सेकंड हँड ईको देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
Eeco हे एक असे वाहन आहे जे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही हेतूंसाठी वापरले जाते. या गाडीचा देखभालीचा खर्चही कमी आहे. त्यामुळे दर महिन्याला या कारची भरपूर विक्री होते. Cars24 वर सध्या काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि तुम्ही फक्त २.८९ लाख रुपयांमध्ये Maruti Eeco घेऊ शकता.
२०१५ मारुती Eeco 7 STR २.८९ लाख रुपयांत खरेदी करा
मारुती ईको ही कार कंपनी ५ सीटर आणि ७ सीटर अशा दोन पर्यायांमध्ये विकते. या कारची किंमत ५.२५ लाख रुपये ते ६.५१ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या एक्स शोरूममधल्या किमती आहेत. या कारमध्ये कंपनीने १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ८१ पीएस पॉवर आणि १०४.४ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील विकली जाते. ईकोचं सीएनजी मॉडेल ७२ पीएस पॉवर आणि ९५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. ही कार पेट्रोलवर १९.७१ किमी प्रति लीटर तर सीएनजीवर २६.७८ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते.
२०१५ मारुती Eeco (सात सीटर) सध्या Cars24 वर उपलब्ध आहे, ही वेबसाइट वापरलेल्या कार्सचा उपलब्ध आहेत, ज्याची मागणी २.८९ लाख रुपये आहे. हे 2nd Owner मॉडेल आहे. या वाहनाने एकूण ९७,९४१ किलोमीटरचा प्रवास केला आहे.
या कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन आहे जे ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. त्यात सीएनजीचा पर्याय मिळणार नाही. हे वाहन सध्या सुरतमध्ये आहे. त्याची नोंदणी फेब्रुवारी २०१६ ची आहे. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Cars24 ला संपर्क करू शकता.
२०१७ मारुती Eeco 7 STR ४.१ लाख रुपयांत
दुसरी मारुती सुझुकी Eeco फक्त Cars24 वर उपलब्ध आहे. ही कार तुम्हाला ग्रे कलरमध्ये मिळेल. या कारने एकूण ६०,९४१ किलोमीटर अंतर कापले आहे. परंतु हे देखील 2nd Owner मॉडेल आहे. त्याची मागणी ४.१ लाख रुपये आहे. हे २०१७ सालचे मॉडेल आहे. या कारमध्ये १.२L पेट्रोल इंजिन आहे जे ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. त्यात सीएनजीचा पर्याय मिळणार नाही. हे वाहन सध्या बंगळुरूमध्ये आहे. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Cars24 ला संपर्क करू शकता. या दोन्ही कारवर झिरो डाउन पेमेंट देखील दिले जात आहे.
जुनी कार खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
सेकंड हँड कार खरेदी करताना तिची सर्व कागदपत्रे नीट तपासली पाहिजेत. तपासून डील फायनल करू नका. याशिवाय, मागील २-३ वर्षांतील नो क्लेम बोनस देखील तपासा. सर्व कागदपत्रे फक्त मूळ स्वरूपात पहा. गाडी चालवून जरूर पहा. जर तुम्हाला कारमधील आवाज किंवा इंजिनमधून आवाज येत असेल तर असा करार करू नका. त्याचप्रमाणे, सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर गोष्टी तपासणं देखील अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा काही गाड्यांचे रेकॉर्ड खराब असतात, जसं काही गाड्यांवर खटले प्रलंबित असतात, ज्यामध्ये पुढे तुम्ही फसू शकता. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड कार घेण्यापूर्वी तिचा इतिहास तपासणं गरजेचं आहे.