Best Selling Used Car: भारतीय वाहन बाजारात दर महिन्याला लाखो कार्सची विक्री होते. भारतातला वाहन बाजार आता खूप मोठा झाला आहे. त्यासोबतच भारतातल्या सेकेंड हँड वाहनांच्या बाजाराची व्याप्ती देखील वाढली आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे नवीन गाडी घेणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे नागरिक कमी किमतीत सेकंड हँड कार खरेदी करण्यास प्राध्यान्य देतात. त्यामुळे जुन्या गाड्यांचा बाजार सध्या जोमात आहे.

वापरलेल्या कारची सर्वाधिक मागणी टियर २ शहरांमध्ये दिसून येते. खरं तर, आता सेकंड हँड कारवर वॉरंटी, चांगली फायनान्स आणि सुलभ ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे लोक त्या खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. ज्या ग्राहकांकडे नवीन कार घेण्याचे बजेट नाही ते त्यांचे कारचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण करतात. अहवालानुसार, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांव्यतिरिक्त टियर-२ शहरांमध्ये आता सेकंड हँड कारची बाजारपेठ वाढत आहे. तर आग्रा, कोईम्बतूर, नागपूर आणि वडोदरा यांसारख्या शहरांमध्येही लोकांनी सेकंड हँड कार खरेदी करण्यात अधिक रस दाखवला आहे.

‘या’ शहरांमध्ये वाढली मागणी

अहवालानुसार, लोकांमध्ये जुन्या गाड्यांबाबत जागरुकता निर्माण झाली आहे, त्यामुळे सेकंड हँड कार बाजारात तेजी आली आहे. मारुती स्विफ्ट, बलेनो, ह्युंदाई ग्रँड i10, होंडा सिटी आणि रेनॉल्ट क्विड लोकांना खूप आवडतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबादमध्येही सेकंड हँड कारची मागणी वाढली आहे.

(हे ही वाचा : होंडाच्या नव्हे तर ‘या’ कंपनीच्या बाईकची बाजारपेठेत तुफान विक्री; ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ दुचाकी)

सेकंड हँड कार बाजारात ‘या’ दोन कारला मोठी मागणी

सेकंड हँड कार बाजारपेठेत दोन कारला ग्राहकांची सर्वाधिक मागणी दिसून आली. मारुती सुझुकीची अल्टो आणि ह्युंदाई i10 या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या. त्यापाठोपाठ मारुती स्विफ्ट आणि ह्युंदाई क्रेटा लोकांच्या आवडत्या कार बनल्या. किया आणि एमजी मोटरच्या वाहनांची विक्रीही जोमात होत आहे.
ग्रँड i10 आणि बलेनो यांची गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक विक्री झाली आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

रिपोर्ट्सनुसार, सेकंड हँड कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा मार्केट शेअर ३४.५% आहे तर Hyundai चा मार्केट शेअर २६.९% आणि Honda चा वाटा १०.६% आहे. सेकंड हँड कार मार्केटमध्ये SUV सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. मारुती ब्रेझा, सोनेट, XUV300, Taigun आणि Tiago यांना ग्राहक खूप पसंती देत ​​आहेत. गेल्या ५ वर्षांत, SUV विभागाचा बाजार हिस्सा १०% वरून २०% पर्यंत वाढला आहे.