या सेगमेंटमधील एक कार म्हणजे Datsun GO Plus जी तिच्या कमी किंमती आणि मोठ्या मायलेज व्यतिरिक्त उत्कृष्ट फिचर्समुळे पसंत केली जाते.
जर तुम्ही शोरूममधून Datsun GO Plus ७ सीटर कार खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ४.२५ लाख ते ६.९९ लाख रुपये खर्च करावे लागतील.
पण आम्ही तुम्हाला त्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही ही ७ सीटर कार अगदी कमी किमतीत खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकाल.
Datsun GO Plus ७ सीटर कारवरील आजच्या ऑफर्स ऑनलाइन सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री वेबसाइटने दिल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सबद्दल सांगत आहोत.
CARANDBIKE वेबसाइटच्या वापरलेल्या कार विभागात Datsun GO Plus च्या 2015 च्या मॉडेलची २.५५ लाख रुपयांची किंमत आहे.
आणखी वाचा : Top 3 Best Mileage Scooters: या टॉप 3 स्कूटर ६८ kmpl पर्यंत मायलेज देतात
या Datsun GO Plus चे 2018 मॉडेल CARWALE वेबसाइटवर पोस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत कोणत्याही ऑफरशिवाय ५.६५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
या Datsun GO Plus चे 2017 मॉडेल CARTRADE वेबसाइटवर विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत ३ लाख रुपये आहे.
आणखी वाचा : सेकंड हँड बाईक खरेदी करण्यापूर्वी या टिप्स एकदा नक्की वाचा, तुमची फसवणूक आणि त्रास वाचेल
Datsun GO Plus वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्स वाचून तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर आता तिच्या इंजिनपासून ते फिचर्सपर्यंत संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या.
Datsun GO Plus मध्ये कंपनीने 1198 cc चे इंजिन दिले आहे जे १.२ लिटरचे इंजिन आहे आणि हे इंजिन ७७ PS ची पॉवर आणि १०४ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
कारच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅ्पल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एन्ट्री, मॅन्युअल एसी, हीटर, रिअर पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि पुढील सीटवर ड्युअल एअरबॅग्ज यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.
कारच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही Datsun GO Plus १९.०२ kmpl चा मायलेज देते ज्याला ARAI ने प्रमाणित केले आहे.