टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये परवडणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज आहे जी तिच्या मायलेज आणि कमी वजनासाठी पसंत केली जाते. हिरो एचएफ डिलक्स ही या सेगमेंटमध्ये अधिक मायलेज देणार्या बाईक्सपैकी एक आहे, जिला कमी किमतीत अधिक मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते.
जर तुम्ही शोरूममध्ये जाऊन ही Hero HF Deluxe खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ५८,८९० रुपये ते ६५,५२० रुपये खर्च करावे लागतील.
पण जर तुमच्याकडे ही बाईक घेण्याचे बजेट नसेल तर येथे जाणून घ्या या बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती ज्यामध्ये तुम्ही ही बाईक अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकाल.
Hero HF Deluxe बाईकवर उपलब्ध असलेल्या ऑफर वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर लीस्ट केल्या आहेत, ज्या सेकंड हँड बाईक्सची खरेदी आणि विक्री करतात, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे तपशील सांगणार आहोत.
पहिली ऑफर QUIKR वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे या Hero HF Deluxe बाईकचे 2018 मॉडेल लीस्ट केले गेले आहे. इथे या बाईकची किंमत २५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथे ही बाईक खरेदी करण्यासाठी कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध होणार नाही.
दुसरी ऑफर OLX वेबसाईटवर देण्यात आली आहे, जिथे Hero HF Deluxe चे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे. येथे या बाईकची किंमत २२,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाइक खरेदी करताना तुम्हाला कोणताही प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.
तिसरी ऑफर DROOM वेबसाइटवर लीस्ट केली आहे. येथे या बाईकचे २०११ चे मॉडेल लीस्ट करण्यात आले असून त्याची किंमत १८,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथून ही बाईक खरेदी करून तुम्ही फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता.
आणखी वाचा : Hyundai Motors Car Discount: Santro ते i20 पर्यंत या गाड्यांवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
Hero HF Deluxe वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील माहित असणं गरजेचं आहे.
बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाईकमध्ये ९७.२ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे.
हे इंजिन ८.०२ PS पॉवर आणि ८.०५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ४ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.
मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही Hero HF Deluxe बाईक ८३ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.