टू व्हीलर सेक्टरच्या बाईक सेगमेंटमध्ये बाइक्सची मोठी श्रेणी आहे जी त्यांच्या कमी किमतीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्टाईल आणि मायलेजसाठी पसंत केल्या जातात. ज्यामध्ये आम्ही Honda CB Shine 125 बद्दल बोलत आहोत जी त्याच्या सेगमेंटसह कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्सच्या यादीत येते.

जर तुम्ही शोरूममध्ये जाऊन Honda Shine खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ७७,३७८ ते ८१,३७८ रुपये खर्च करावे लागतील, परंतु येथे नमूद केलेल्या ऑफर वाचल्यानंतर तुम्ही ही बाईक केवळ ३० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकाल.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क

Honda CB Shine 125 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स सेकंड हँड बाईक्स खरेदी आणि विक्री करणार्‍या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेतल्या गेल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे तपशील सांगत आहोत.

आणखी वाचा : Best Selling Electric Scooters India: सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ३ इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत आणि रेंज जाणून घ्या

पहिली ऑफर OLX वेबसाइटवर देण्यात आली आहे जिथे Honda Shine चे २०१२ चे मॉडेल लीस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत १५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

दुसरी ऑफर BIKE4SALE वेबसाइटवर दिली गेली आहे जिथे या बाईकचे २०१४ चे मॉडेल लीस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत २२ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्हाला कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिला जाणार नाही.

तिसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून घेतली गेली आहे जिथे या बाईकचे २०१६ चे मॉडेल विक्रीसाठी लीस्ट केले आहे. इथे या बाईकची किंमत २५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करताना तुम्ही फायनान्स प्लॅन देखील मिळवू शकता.

आणखी वाचा : फक्त ९ हजारांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करा ६४ kmpl मायलेजची TVS Jupiter

Honda Shine वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर या बाईकचे इंजिन, स्पेसिफिकेशन आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Honda Shine च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात १२४ cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन १०.७४ PS ची पॉवर आणि ११ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत, होंडा दावा करते की ही Honda Shine ६५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Story img Loader