Hyundai Motor ची Hyundai Verna ही सेडान सेगमेंटमधील एक प्रीमियम कार आहे जी तिच्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांमुळे बऱ्याच काळापासून बाजारात आहे. Hyundai Motor या सेडान कारचा नवा अवतार लवकरच बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
Hyundai Verna किंमत
तुम्ही शोरूममधून Hyundai Verna विकत घेतल्यास, त्यासाठी तुम्हाला ९.६४ लाख ते १५.७२ लाख रुपये लागतील. पण इथे आम्ही त्या ऑफर्सची माहिती सांगत आहोत ज्यात तुम्हाला या सेडानचे सेकंड हँड मॉडेल ३ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळेल.
(हे ही वाचा : मार्केटमध्ये तुफान मागणी असणाऱ्या मारुतीच्या ‘या’ कारला १ लाखात घरी आणा, एवढा बसेल EMI )
Second Hand Hyundai Verna
कमी किमतीत सेकंड हँड Hyundai Verna खरेदी करण्याची पहिली ऑफर OLX वेबसाइटवर आहे. येथे दिल्ली नोंदणीसह सेडानचे २०१२ मॉडेल सूचीबद्ध केले आहे, ज्याची किंमत २ लाख रुपये आहे. कार खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा योजना असणार नाही.
Used Hyundai Verna
वापरलेली Hyundai Verna खरेदी करण्याची पुढील स्वस्त ऑफर DROOM वेबसाइटवर आहे. येथे हरियाणा नंबर प्लेटसह २०१३ चे मॉडेल Verna सूचीबद्ध आहे. या सेडानची किंमत २.५० लाख रुपये ठेवण्यात आली असून ती खरेदी केल्यावर ग्राहकांना सुलभ डाउन पेमेंटसह फायनान्स प्लॅन देखील मिळेल.
(हे ही वाचा : जबरदस्त स्पीड-शानदार डिझाईनवाली स्ट्रीटफाइटर बाईक १५ हजारात खरेदी करा, ‘इतका’ भरा EMI )
Hyundai Verna Second hand
Hyundai Verna सेकंड हँड मॉडेलवरील पुढील स्वस्त डील CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे दिल्ली नोंदणीसह २०१४ चे मॉडेल Hyundai Verna विक्रीसाठी आहे. जर तुम्हाला ही सेडान खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ३ लाख रुपये मोजावे लागतील आणि या सेडानसोबत फायनान्स प्लॅनही उपलब्ध असेल.
महत्त्वाची सुचना: सेकंड हँड Hyundai Verna वरील ऑफर्सचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही या तीनपैकी कोणतेही पर्याय खरेदी करू शकता. परंतु कोणतीही कार ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, तिची मूळ स्थिती तपासा, जसे की बॉडी कलर, टायर्स, इंजिन सारखे भाग जेणेकरुन डील नंतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागणार नाही.