कार सेक्टरमधील ऑफ-रोड एसयूव्ही सेगमेंट त्याच्या शक्तिशाली कारसाठी ओळखला जातो. या कार साहसी आणि लांब पल्ल्याच्या ट्रिपला जाणाऱ्या लोकांना तुलनेने जास्त आवडतात. महिंद्रा थार ही ऑफ-रोड एसयूव्ही सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. तुम्हीही जर महिंद्रा थारचे चाहते असाल आणि ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या कारवर उपलब्ध ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत.
शोरूममधून महिंद्रा थार खरेदी करण्यासाठी तुम्हाला १२.७८ लाख ते १५.०५ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु या ऑफरद्वारे तुम्ही ही कार अर्ध्या किमतीत म्हणजेच ७ लाख रुपयांमध्ये घरी नेऊ शकता. महिंद्रा थार वरील आजची ऑफर सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणार्या वेबसाइटने दिली आहे. त्यांनी त्यांच्या साइटवर ही कार पोस्ट केली असून तिची किंमत ७,६५,६९९ रुपये ठेवली आहे.
Video: सरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या
वेबसाईटवर महिंद्र थारबद्दल दिलेल्या माहितीनुसार, या कारचे मॉडेल फेब्रुवारी २०१८ चे असून ती आतापर्यंत ५२,००१ किमी धावली आहे. या कारची पहिलीच ओनरशीप असून तिची नोंदणी DL 8C दिल्ली येथील आरटीओ कार्यालयात आहे. ही SUV खरेदी केल्यावर, कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी देत आहे, त्याच्यासोबत सात दिवसांचा मनी बॅक गॅरंटी प्लॅन देखील देण्यात येतोय.
या मनी बॅक गॅरंटी प्लॅननुसार, जर तुम्ही ही कार खरेदी केली आणि तुम्हाला ती आवडत नसेल किंवा त्यात काही दोष आढळला तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. ही महिंद्रा थार परत केल्यानंतर, कंपनी तुम्हाला कोणतेही प्रश्न न विचारता तसेच पैशांची कोणतीही कपात न करता तुमचे संपूर्ण पेमेंट परत करेल. याशिवाय, ज्यांचे बजेट खूपच कमी आहे आणि त्यांना ही कार लोनवर खरेदी करायची आहे, अशा लोकांसाठी कंपनी लोनची सुविधा देखील देत आहे.
या लोन प्लॅननुसार, तुम्ही झीरो डाउन पेमेंटसह ही कार घरी नेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला दरमहा १७,५६३ रुपये महिन्याला ईएमआय भरावा लागेल. याशिवाय, कंपनी इतर काही बेनिफीट देखील देत आहे, ज्यामध्ये ५ हजार रुपये शिपिंग शुल्क आकारले जाणार नाही. मोफत आरसी हस्तांतरण सुविधा दिली जाईल आणि कंपनीकडून थर्ड पार्टी विमा देखील दिला जाईल.