Second Hand Maruti Alto car Best Deals : कमी बजेटच्या हॅचबॅक कारपासून लक्झरी स्पोर्ट्सच्या कारपर्यंत सर्व गाड्या भारतात उपलब्ध आहे तरी सुद्धा कार घेण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण होत नाही कारण अनेकांजवळ नवीन कार घेण्यासाठी ४ ते ५ लाख रुपयांचे बजेट नसते आणि अशा लोकांची संख्या भारतात खूप जास्त आहे. अशा वेळी कमी बजेट असलेल्या लोकांसाठी ‘सेकंड हँड’ कार खरेदी करणे उत्तम पर्याय असतो. तुम्ही सुद्धा कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Second Hand Maruti Alto car Best Deals for Used Maruti Alto in low budget)

कमी बजेटमध्ये पूर्ण करा कार खरेदी करण्याचे स्वप्न (Used Maruti Alto in low budget)

Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
OpenAI launch o1 and o1 mini
OpenAI कडून नवीन एआय मॉडेल्स लाँच; स्पर्धा परीक्षांसाठी ठरणार उपयुक्त; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Namibia animal killing marathi news
लोक खारींपासून हत्तींपर्यंत वाट्टेल ते का खातात?
Shaktikanta Das statement that banks should give priority to women in employment
बँकांनी महिलांना रोजगारसंधीत प्राधान्य द्यावे – दास
Reserve Bank Deputy Governors confident of hike in savings rate
बचतच अर्थव्यवस्थेत कर्ज-वितरणाचा सर्वोच्च स्रोत राहील; रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नरांचा बचतदरात वाढीचा विश्वास
More than a thousand people on waiting list right to education admission process for all
यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया
If you are an iPhone 15 user, should you upgrade to iPhone 16
iPhone 15 Vs iPhone 16: iPhone 15 होणार २० हजार रुपयांनी स्वस्त? कोणता फोन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट?

बजेटची समस्या लक्षात घेऊन आज आपण देशातील सर्वात जास्त लोकप्रिय कारपैकी एक असलेली मारुती सुझुकी ऑल्टो च्या सेकंड हँड मॉडेलविषयी जाणून घेणार आहोत. हा मॉडेल फक्त ५० हजार पासून १ लाखापर्यंत मिळू शकतो.

हेही वाचा : ना Bajaj Chetak ना TVS iQube, देशातील बाजारपेठेत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरनं केलं सर्वाचं मार्केट जाम, झाली दणक्यात विक्री

या सेकंड हँड मारुती ऑल्टोची ही डील ओएलएक्स (OLX) वर उपलब्ध आहे जिथे या हॅचबॅकचा २०११ चा मॉडेल लिस्ट करण्यात आला आहे. या कारची ऑनरशिप दुसरी आहे आणि याचे रजिस्ट्रेशन दिल्ली येथील आहे. या कारची किंमत ६५ हजार रुपये आहे.

सेकंड हँड मारुती ऑल्टो खरेदी करण्याची दुसरी स्वस्त डील DROOM वर उपलब्ध आहे. या कारचे रजिस्ट्रेशन गुरुग्राम येथील आहे आणि हा २०१२ चा मॉडल आहे ज्याची ऑनरशिप
पहिली आहे. विक्रेत्याने या कारची किंमत ९० हजार रुपये सांगितली आहे. या कारबरोबर फायनान्स प्लॅन सुद्धा दिला जाणार आहे.

हेही वाचा : How To Maintain Bike Chain: फक्त २० मिनिटांत स्वच्छ होईल तुमच्या बाईकची चेन; ‘या’ तीन टिप्स करा फॉलो; सुरक्षित होईल तुमचा प्रवास

मारुति ऑल्टोची सेकंड हँड मॉडलवर मिळणारी ही शेवटची डील आहे. ही डील QUIKR वर उपलब्ध असून मारुती ऑल्टोचा हा २०१३ चा मॉडल आहे. या कारची ऑनरशिप पहिली आहे. विक्रेत्याने १ लाख २० हजार रुपये या कारची किंमत सांगितली आहे. या कारबरोबर फायनान्स प्लॅन सुद्धा दिला जाणार आहे.