कार क्षेत्रातील हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती ते ह्युंदाई आणि टाटा ते रेनॉल्टपर्यंत कमी बजेटच्या कार आहेत. ज्यामध्ये आज आम्ही हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार मारुती वॅगनआरबद्दल बोलत आहोत, जी कमी किंमतीत बूट स्पेस आणि चांगल्या मायलेजसह फिचर्ससाठी पसंत केली जाते.
शोरूममधून ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५.१८ लाख ते ६.८५ लाख रुपये खर्च करावे लागतील, परंतु इथे नमूद केलेल्या ऑफरद्वारे तुम्ही २ लाखांच्या बजेटमध्ये ती घरी घेऊन जाऊ शकता.
ही ऑफर काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आधी मारुती WagonR 2012 मॉडेलचे फिचर्स, स्पेसिफीकेशन्स यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीने यामध्ये ९९८ cc इंजिन दिले आहे, जे ६७.१ bhp पॉवर आणि ९० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि या इंजिनला ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
कारच्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो, कमी इंधन वॉर्निंग लाइट, मागील सीट हेडरेस्ट, कप होल्डर फ्रंट, एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिपमीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.
कारमध्ये दिलेल्या प्रीमियम फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, पॅसेंजर साइड रीअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, साइड इम्पॅक्ट बीम, अॅडजस्टेबल सीट यासारखी फिचर्स यात देण्यात आली आहेत.
आणखी वाचा : वजनाने हलक्या असलेल्या या टॉप ३ स्कूटर जास्त मायलेज देतात, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मारुती वॅगनआरच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही कार १८.९ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.
Maruti WagonR 2012 मॉडेलचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेतल्यानंतर तुम्हाला ते अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याच्या योजनेचे संपूर्ण डिटेल्स माहित असणं गरजेचं आहे.
Maruti True Value ने ही मारुती वॅगनआर त्यांच्या साइटवर शेअर केली आहे, ज्याचे मॉडेल २०१२ मधलं आहे आणि त्याची किंमत १,७०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी हमी आणि वॉरंटीसह फायनान्स देखील देत आहे.
CARDEKHO वेबसाइटने मारुती WagonR ची ही जाहिरात पोस्ट केली आहे. हे मॉडेल २०१२ मधलं आहे आणि त्याची किंमत २ लाख रुपये ठेवण्यात आली आहे, त्यासोबत कंपनी हमी, वॉरंटी आणि कर्ज योजना देखील देत आहे.
आणखी वाचा : केवळ १ ते २ लाखांमध्ये घरी घेऊन जा Hyundai i10, गॅरंटी आणि वॉरंटी सुद्धा मिळणार
DROOM वेबसाइटवर सुद्धा जाहिरत दिली आहे. ज्याचे मॉडेल २०१० मधलं आहे आणि त्याची किंमत १,५७,६०० रुपये ठेवण्यात आली आहे. यासह कंपनी कर्जाची सुविधा देखील प्रदान करत आहे.
येथे नमूद केलेल्या मारुती वॅगनआरचे तीन पर्याय पाहिल्यानंतर आणि त्यांचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार तीनपैकी कोणतीही कार खरेदी करू शकता.