Royal Enfield Bike: अनेकांना बाईकचं प्रचंड वेड असतं. खासकरून, तरुणांमध्ये बाईकचं वेड अधिक असतं. खासकरुन रॉयल एनफिल्डच्या बाईक तरुणांना फार आवडतात. अशा बाईकप्रेमी तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफिल्ड ही बाईक्स बनवणारी भारतीय मल्टिनॅशनल कंपनी आहे. १९५५ साली या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या बाईक्स आजही सर्वांना भुरळ घालतात. या कंपनीच्या विविध बाईक्स मार्केटमध्ये आहेत.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक घ्या अर्ध्यांपेक्षा कमी किमतीत
क्रूझर बाईक्सच्या सेगमेंटमध्ये Royal Enfield Classic 350 ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. या बाईकला देशभरात खूप मागणी आहे. ही बाईक तिचा लूक, स्टाईल, इंजिन आणि मायलेजमुळे भारतीयांची पसंती मिळवत आहे. परंतु ही बाईक थोडी महाग आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १.९० लाख रुपये इतकी आहे. ही बाऊक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २.२१ लाख रुपये (ऑन रोड प्राईस) खर्च करावे लागतात. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही क्लासिक ३५० ही बाइक खरेदी करू शकत नाहीत.
जर तुम्ही देखील किंमतीमुळे ही बाईक विकत घेऊ शकत नसाल तर येथे जाणून घ्या या क्रुझर बाईकवर उपलब्ध असलेली स्वस्त डील. ही बाईक तुम्हाला अर्ध्या पेक्षा कमी किमतीत मिळेल.
सेकंड हँड रॉयल एनफील्ड क्लासिक 350 वर या ऑफर सेकंड हँड वाहनांची विक्री करणार्या वेबसाइटवरून घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या सर्वोत्तम डीलची माहिती मिळेल.
(हे ही वाचा : तरुणांना वेड लावणाऱ्या Royal Enfield च्या सुपरबाईकची किंमत आली समोर, झटपट करा बुकींग )
Second Hand Royal Enfield Classic 350
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची पहिली डील तुम्हाला OLX वेबसाइटवर मिळेल, येथे या क्रूझर बाईकचे 2012 चे मॉडेल दिल्ली नंबर प्लेट सूचीबद्ध आहे. या बाईकची किंमत 50 हजार ठेवण्यात आली आहे. विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.
Used Royal Enfield Classic 350
वापरलेल्या Royal Enfield Classic 350 वर आणखी एक स्वस्त डील DROOM वेबसाइटवर पोस्ट केली आहे आणि त्यात दिल्ली नोंदणीसह २०१४ मॉडेलची सूची आहे. बाईकची किंमत ६०,००० रुपये ठेवण्यात आली असून त्यासोबत फायनान्स प्लॅनही उपलब्ध असेल.
(हे ही वाचा : 50 हजारांपेक्षा कमी किंमतीतील ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळेल मोठ्या रेंजची हमी )
Royal Enfield Classic 350 Second Hand
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सेकंड हँड मॉडेलवरील आजची तिसरी स्वस्त ऑफर BIKEDEKHO वेबसाइटवर पोस्ट करण्यात आली आहे. २०२६ मॉडेल या वेबसाइटवर सूचीबद्ध केले गेले आहे, ज्याची किंमत ७५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक खरेदीवर विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर दिली जाणार नाही.