सनरूफ हे एक प्रीमियम फीचर आहे ज्याची मागणी अलिकडच्या वर्षांत देशातील वाहन क्षेत्रात झपाट्याने वाढली आहे. लोकांची ही मागणी पाहून कार निर्मात्यांनी त्यांच्या नवीन गाड्यांमध्ये सनरूफ देण्यास सुरुवात केली आहे. पण अनेकदा सनरूफ असलेल्या कारच्या किमती जास्त असल्याने लोक या गाड्या घेण्यासाठीचं बजेट तयार करू शकत नाहीत. म्हणूनच अशा लोकांना लक्षात ठेवून आज आम्ही तुम्हाला त्या ऑफर्सची माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त ३ लाखांच्या बजेटमध्ये सनरूफ असलेली प्रीमियम कार खरेदी करू शकाल.

येथे आम्ही Skoda Superb बद्दल बोलत आहोत, ज्याला शोरूममधून खरेदी करण्यासाठी तुम्हाला ३८ लाख रुपये खर्च करावे लागतील. परंतु या ऑफरद्वारे, तुम्ही ही कार Alto 800 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता आणि ती घरी घेऊन जाऊ शकता.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार

स्कोडा सुपर्ब ही सनरूफ असलेली प्रीमियम कार आहे, ज्यावर ऑफर्स वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून प्राप्त झाल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला निवडक ऑफर्सचे डिटेल्स सांगणार आहोत.

आणखी वाचा : CNG कार घ्यायचीय? ७० ते ८० हजार खर्च करून घरी घेऊन जा Maruti Alto CNG

पहिली ऑफर DROOM वेबसाइटवर केली गेली आहे आणि येथे Skoda Superb चे २०१० चे पेट्रोल व्हेरिएंट पो्स्ट केले आहे. इथे या कारची किंमत २,२५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

दुसरी ऑफर OLX वेबसाइटवर दिली आहे. येथे या Skoda Superb चे २००९ चे मॉडेल पोस्ट केले आहे. या कारची किंमत येथे २,७५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार खरेदी करताना कोणतीही ऑफर किंवा प्लॅन असणार नाही.

आणखी वाचा : Top 3 Cheapest Car India: बजेट कमी असेल तर घ्या या टॉप ३ कार, फक्त ४ लाख रुपयांत

तिसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून आली आहे जिथे या कारचे २०११ चे मॉडेल पोस्ट केले आहे. या कारची किंमत येथे २.५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कारच्या खरेदीवर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर कोणतीही ऑफर दिली जाणार नाही. इथे नमूद केलेल्या ऑफरचे डिटेल्स वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या बजेट आणि पसंतीनुसार या तीनपैकी कोणताही पर्याय खरेदी करू शकता.

महत्त्वाची माहिती: कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी त्याची स्थिती, त्याचे कागद आणि इतर महत्त्वाची माहिती जरूर घ्या, अन्यथा कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

Story img Loader