भारतीय कार बाजारपेठेत सध्या एसयूव्हींना प्रचंड मागणी आहे. प्रशस्त इंटेरिअर, उंच ग्राउंड क्लियरन्स, दमदार इंजिन आणि सुलभ प्रवासासाठी देण्यात आलेले फीचर यामुळे ग्राहकांना त्या भूरळ घालतात. खडतर रस्ते आणि उंच ठिकाणांवर पोहोचून देणाऱ्या काही ऑफरोड एसयूव्ही देखील बाजारात उपलब्ध आहेत.
ऑफरोडींगसाठी महिंद्रा थारला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. अनेकांना ती हवीहवीशी वाटते, पण इच्छेपुढे मोठी किंमत आड येते. या एसयूव्हीची किंमत १३.५९ ते १६.२९ लाखांपर्यंत आहे. पण, किंमतीमुळे इच्छा मोडण्याची गरज नाही. सेकंड हँड मार्केटमध्ये या कार अगदी ४ लाखांपासून मिळत आहे.
(केवळ ४५ हजारांमध्ये मिळतोय ‘हा’ इलेक्ट्रिक स्कुटर, ८५ किमीची रेंज, सुरक्षेसाठी ‘हे’ फीचर)
सेकंड हँड मार्केटमध्ये थार अर्ध्यापेक्षाही कमी किंमतीत मिळत आहे. आज अशाच काही थार एसयूव्हींबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. या सेकेंड हँड थार एसयूव्हींवर ऑफर मिळत आहेत. ऑफरमुळे तुम्ही या एसयूव्ही बजेटमध्ये खरेदी करू शकता.
१) ओएलएक्स
ओएलएक्सवर महिंद्रा थारचे २०१४ चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या वाहनाची नोंदणी हरयाणाची आहे. या एसयूव्हीची किंमत ४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, खरेदीसाठी तिच्यावर कुठलेही फायनान्स प्लान किंवा ऑफर सेलरकडून देण्यात आलेले नाही.
२) ड्रुम
ड्रुम संकतस्थळावरही विक्रीसाठी एका थारची माहिती देण्यात आली आहे. २०१५ चे हे मॉडेल असून त्यास दिल्लीचे नंबर आहे. या थारची किंमत ४.७५ लाख रुपये आहे. या एसयूव्हीवर फायनान्स प्लान देखील मिळत आहे.
३) कारट्रेड
कारट्रेडवर यूपीमध्ये नोंदणी झालेली २०१५ मॉडेल थार एसयूव्हीची माहिती देण्यात आली आहे. या एसयूव्हीची किंमत ५.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या वाहनावर कुठलेही फायनान्स प्लान किंवा ऑफर उपलब्ध नाही.
ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही आपल्या बजेट आणि आवडीनुसार यातील कोणतीही थार घेऊ शकता. मात्र, या सेकेंड हँड एसयूव्ही घेण्यापूर्वी त्यांची कागदपत्रे तपासायला विसरू नका. तसेच, चांगल्या मेकॅनिककडून या वाहनांना तपासा. कारमध्ये काही समस्या असल्यास ती कळेल आणि मोठे नुकसान होण्याचे टळेल.