स्कूटर सेगमेंट हा कमी मायलेजपासून आकर्षक डिझाइन केलेल्या स्कूटरपर्यंत दुचाकी क्षेत्रातील मोठी रेंज असलेला विभाग आहे. ज्यामध्ये काही स्कूटर त्यांच्या डिझाईनसाठी तसेच त्यांच्या मायलेजसाठी पसंत केल्या जातात.

मोठी मायलेज आणि स्टायलिश डिझाईन असलेल्या स्कूटर्सच्या रेंजमध्ये आज आम्ही यामाहा फॅसिनोबद्दल बोलत आहोत, जी मायलेजसह तिच्या आकर्षक डिझाईनसाठी पसंत केली जाते.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग

Yamaha Fascino 125 ची सुरुवातीची किंमत ७६,१०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी टॉप व्हेरिएंटवर जाताना ८५,६३० रुपयांपर्यंत जाते. तुम्हालाही ही स्कूटर आवडली असेल, तर इथे जाणून घ्या ही स्कूटर ८५ हजारांऐवजी केवळ ३० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याच्या ऑफरबद्दल…

Yamaha Fascino वरील ऑफर्स सेकंड हँड वाहन खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाईटवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफर्सबद्दल सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही कमीत कमी किमतीत चांगली स्कूटर खरेदी करू शकता.

Yamaha Fascino वरील पहिली ऑफर QUIKR वेबसाईटवरून येते जिथे स्कूटरचे २०१५ मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत २२,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही येथून ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : Hyundai Tucson प्री-बुकिंग सुरू, ४ ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती

दुसरी ऑफर OLX वेबसाईटवर दिली आहे. इथे या स्कूटरचे २०१६ चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे आणि त्याची किंमत २५,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. येथे या स्कूटरसोबत कोणताही फायनान्स प्लॅन किंवा इतर ऑफर उपलब्ध होणार नाही.

तिसरी ऑफर DROOM वेबसाईटवरून आली आहे, जिथे यामाहा फॅसिनोचे २०१६ चे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे. इथे या स्कूटरची किंमत २३,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि ती खरेदी करताना तुम्हाला फायनान्स प्लॅन देखील मिळेल.

Yamaha Fascino वर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला या स्कूटरचे इंजिनपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घ्या…

आणखी वाचा : Electric Scooter Buying Guid : इलेक्ट्रिक स्कूटर घेताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा

Yamaha Fascino मध्ये कंपनीने १२५ cc सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ८.२ PS पॉवर आणि १०.३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

स्कूटरच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही, Yamaha Fascino ६८.७५ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने या स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे ज्यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडले गेले आहेत.