यामाहा रे झेडआर स्कूटर ही एक अशीच स्कूटर आहे जी त्याच्या स्पोर्टी डिझाइन आणि स्पीडसाठी पसंत केली जाते. जर तुम्ही शोरूममधून Yamaha Ray ZR खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला ५४,८८१ रुपये खर्च करावे लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही ऑफर वाचून तुम्ही ही स्कूटर फक्त ३८ हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. Yamaha Ray ZR वरील ही ऑफर BIKES24 द्वारे दिली गेली आहे जी सेकंड हँड दुचाकी खरेदी करणार्‍या वेबसाइटने त्यांच्या साइटवर ही जाहिरात पोस्ट केली आहे. ही स्कूटर ३८ हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे.

वेबसाइटवर दिलेल्या या स्कूटरच्या माहितीनुसार, या स्कूटरचे मॉडेल २०१७ मधलं आहे आणि त्याची फर्स्ट ओनरशीप आहे. या स्कूटरने आतापर्यंत २५,१४५ किमी अंतर कापले आहे आणि त्याची नोंदणी दिल्लीतील DL 08 RTO कार्यालयात झाली आहे.

आणखी वाचा : झीरो डाउन पेमेंटवर २.५ लाखांमध्ये Alto K10 खरेदी करा, मनी बॅक गॅरंटीसह मिळणार २४ kmpl मायलेज

कंपनीकडून या स्कूटरच्या खरेदीवर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे, त्यासोबत सात दिवसांची मनी बॅक गॅरंटीही दिली जाईल.

या मनी बॅक गॅरंटीनुसार, ही स्कूटर खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत तुम्हाला ती आवडली नाही, तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता.

स्कूटर परत केल्यानंतर, कंपनी तुम्हाला तुमचे पूर्ण पेमेंट कोणत्याही विचारपूस शिवाय किंवा कोणत्याही कपातीशिवाय परत करेल.

ही ऑफर वाचल्यानंतर, जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल, तर या स्कूटरची फिचर्स आणि स्पेसिफिकेशनची प्रत्येक छोटी माहिती जाणून घ्या.

आणखी वाचा : फक्त ५९ हजार भरून Tata Tiago घरी घेऊन जा, प्रीमियम फीचर्ससह २३ kmpl ची मायलेज मिळेल

Yamaha Ray ZR स्कूटरमध्ये 113 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 7.10 PS पॉवर आणि 8.10 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आलं आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ती 66 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand yamaha ray zr in 38 thousand with 1 year warranty and guarantee plan read full details prp