भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा भारतात नवीन महिंद्रा XUV3X0 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन SUV २९ एप्रिल रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. सध्या, ही नवीन कार लाँच करण्यापूर्वी, कंपनीने या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केले आहे. XUV3X0 ची २१,००० रुपयांची टोकन रक्कम भरून निवडक महिंद्रा डीलरशिपवर बुक केली जाऊ शकते.

लाँचपूर्वी, महिंद्राने आगामी XUV3X0 चे टीझर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांबद्दल काही माहिती समोर आली आहे. Mahindra XUV3X0 चा टीझर दर्शवितो की, त्यात नवीन इंटीरियर डिझाइन असेल, जे अद्यतनित XUV400 मॉडेलपासून प्रेरित असेल. या SUV मध्ये मोठी २६.०४ सेमी टचस्क्रीन आणि इंफोटेनमेंटसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असण्याची अपेक्षा आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

(हे ही वाचा : ६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग )

टीझरमध्ये असेही दिसून आले आहे की, या आगामी SUV मध्ये पांढऱ्या-थीम असलेली इंटीरियर आणि पॅनोरॅमिक असेल, जी मागील सीटपर्यंत वाढेल. याशिवाय XUV3X0 मध्ये वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि नवीन अपहोल्स्ट्री दिली जाऊ शकते. जुन्या टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, या कारला पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि हेडलाइट्स दिले जातील. याशिवाय, या कार एसयूव्हीमध्ये मागील बाजूस कनेक्टेड टेल लाईट्स देखील असतील. आणखी एका टीझरमध्ये असे दिसून आले आहे की, त्यात हवेशीर जागा आणि प्रीमियम साउंड सिस्टम असेल.

इंजिन कसे असेल?

नवीन XUV3X0 ला विद्यमान XUV300 सारखे इंजिन पर्याय मिळतील अशी अपेक्षा आहे. या पर्यायांमध्ये दोन टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन समाविष्ट असू शकते. हे पेट्रोल इंजिन अनुक्रमे १०८ bhp पॉवर आणि २०० Nm टॉर्क आणि १२८ bhp पॉवर आणि २५० Nm टॉर्क जनरेट करतात. तर, डिझेल इंजिन ११५ bhp पॉवर आणि ३०० Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनांसोबत ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AMT ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.