कर्जावर वस्तू घेणे आजकाल खूप सोपे आहे. परंतु कर्जाची परतफेड करणे कधीकधी बऱ्याच लोकांना कठीण होते. असेच एक कर्ज म्हणजे गाडी खरेदीसाठी घेतलेलं कर्ज. काही लोकं गाडी खरेदी केल्यानंतर त्याचे हप्ते वेळेवर भरू शकत नाहीत आणि अडकल्यासारखे वाटते. अशा स्थितीत कर्ज काढून घेतलेली कार विकण्याचा पर्यायही त्यांच्याकडे आहे. कर्ज असलेलली कार कशी विकली जाते? जाणून घेऊयात.
गृहकर्ज असो की, वैयक्तिक कर्ज यासाठी एक लॉक-इन कालावधी असतो. कार कर्जातही असंच असतं. किमान मासिक हप्ते भरेपर्यंत कर्जाची रक्कम भरू शकत नाहीत. बहुतेक बँका प्री-क्लोजर चार्ज आकारतात. कार कर्जासह विकायची असल्यास काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. मुदतीपूर्वी कर्ज समाप्त करण्यासाठी तुम्हाला बँकेला किती रक्कम भरावी लागेल याची गणना करणे आवश्यक आहे. मग त्याची तुलना तुमच्या वापरलेल्या कारच्या वास्तविक मूल्याशी करा. तुम्हाला कर्ज बंद करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे मिळतील की तुम्हाला स्वतःच्या खिशातून काहीतरी काढावे लागेल? हे तुमच्या कारच्या डेप्रिसिएशन वॅल्यूवर अवलंबून आहे. काही प्रकरणांमध्ये, तुमच्याकडे तुलनेने नवीन कार असली तरीही, वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत कमी मागणी असल्यास मोठ्या अवमूल्यनाचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे कारचं बाजारमूल्य पॅडिंग लोनच्या रकमेपेक्षा जास्त असेल तरच कार विकणे शहाणपणाचे आहे. पहिल्यांदा बेस्ट रीसेल वॅल्यू कार खरेदी करणंही योग्य ठरेल.
Hero Super Splendor VS Honda SP 125: किंमत आणि मायलेजमध्ये कोण वरचढ आहे? जाणून घ्या
तुम्ही गाडी कर्जावर घेतली असल्यास त्याची नोंद रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर असते. कार विकायची असल्यास पहिल्यांना कर्ज फेडाणं गरजेचं आहे. त्यानंतर बँकेकडून एनओसी घेऊन आरटीओकडे जमा करावी लागेल. त्यामुळे नवं रजिस्ट्रेशन कार्ड मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेला काही दिवस लागण्याची शक्यात आहे. कार विकण्यापूर्वी ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही खरेदीदाराला तुमच्या वाहनाची किंमत तुमच्या वतीने थेट बँकेला देण्याची व्यवस्था करू शकता. तसेच कर्जावरील थकबाकीची रक्कम सहज भरू शकता. तथापि, जर उर्वरित कर्जाची रक्कम कारच्या मूल्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला फरक स्वतः भरावा लागेल. त्यामुळे कार कर्जापासून मुक्त होत एनओसी मिळवू शकाल. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय नवीन मालकास कार विकता येईल. जेव्हा तुम्ही संभाव्य खरेदीदार, व्यक्ती आणि डीलर्स दोघांशी बोलता तेव्हा कारवरील कोणत्याही थकबाकीबद्दल स्पष्टता ठेवा. जर तुम्ही नवीन कार घेण्यासाठी कार विकत असाल, तर तुमचा वापरलेल्या कारचा डीलर तुमचे सध्याचे कर्ज फेडण्यासाठी वित्त पर्यायांची व्यवस्था करू शकतो. कारण डिलर्संना दोन्ही बाजूंनी कमाई करतात.