Documents to sell your car: एखादी नवीन कार घ्यायची असेल किंवा विकायची असेल तेव्हा प्रत्येक जण गोंधळून जातो. एखादी कार, दुचाकी विकताना त्यातून फायदा होईल का, कोणती कागदपत्रे लागतील आदी अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागतात. तर कार विकण्याची ही प्रक्रिया पूर्ण करताना कायदेशीर व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी विविध कागदपत्रे सबमिट करणेही आवश्यक असते. तर भारतात कार विकण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे…

१. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट : रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आरसी. वाहनाची मालकी व रजिस्ट्रेशन सिद्ध करणारे आरसी हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
After the woman fell from the roof, her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love
VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं

२. ओनरशिप २९ फॉर्म ट्रान्सफर करणे : संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरच तुमच्या वाहनाची मालकी हस्तांतरित (ओनरशिप ट्रान्स्फर) करा. २९ हा फॉर्म विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे गाडीची मालकी हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो.

३. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (इनओसी) (NOC) : वाहनासंबंधित तुमचं कोणतंही कर्ज, फी बाकी नसल्याचा पुरावा NOC देते.

४. पोलूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUC Certificate) : वाहन जर प्रदूषण करीत असेल तर संबंधित वाहन मालकाला ते वाहन दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी PUC सर्टिफिकेट म्हणजेच पोलूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट गाड्यांसाठी काढावं लागतं. त्यामुळे गाडीचं वैध सर्टिफिकेट आहे का याची खात्री करून घ्या.

५. कारचे इन्शुरन्स सर्टिफिकेट (Insurance Certificate) : विमा संरक्षणाचा पुरावा द्या.

६. रोड टॅक्स पावती (Road Tax Receipt) : रोड टॅक्स भरला असेल त्याचा पुरावा दाखवा.

हेही वाचा…How To Maintain Bike Chain: फक्त २० मिनिटांत स्वच्छ होईल तुमच्या बाईकची चेन; ‘या’ तीन टिप्स करा फॉलो; सुरक्षित होईल तुमचा प्रवास

७. पत्त्याचा पुरावा : पत्त्याचा पुरावा म्हणून विक्रेत्याला आधार, पासपोर्टची प्रतदेखील सादर करावी लागेल.

८. ओळख पुरावा : विक्रेत्याला ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रतदेखील सादर करावी लागेल.

९. फॉर्म ३० : ओनरशिप हस्तांतरणासाठी आरटीओकडे अर्ज करावा लागेल.

१०. प्रतिज्ञापत्र : वाहनाची स्थिती, कर्ज नमूद करणारं प्रतिज्ञापत्र विक्रेत्याकडून अवश्य घ्या.

११. वाहनाची माहिती, विक्री किंमत, लोन, पेमेंट कश्या पद्धतीत झालं याबद्दलची सविस्तर माहिती घ्या.

१२. आरटीओ एंडोर्समेंट : आरटीओकडून आरसी आणि फॉर्म २९ वर एंडोर्समेंट मिळवा.

ही सर्व कागदपत्रे एकत्र घ्या आणि मालकी हस्तांतरणासाठी आरटीओकडे जमा करा. विक्री प्रक्रियेदरम्यान समस्या टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत ना आणि वाहन चांगल्या स्थितीत असल्याची खात्रीसुद्धा करून घ्या…

याव्यतिरिक्त खालील गोष्टींचाही विचार करा :

१. वाहनाची विक्री करण्यापूर्वी सर्व कर, दंड भरला आहे का खात्री करून घ्या.
२. विमा कंपनीला मालकी हस्तांतरणाची सूचना द्या.
३. वाहनाच्या चाव्या, मॅन्युअल आणि इतर ॲक्सेसरीज खरेदीदाराकडे सोपवा.
४. जुन्या कार विकणाऱ्या वेबसाइट तपासा, तुमच्या कारची सध्याची किंमत जाणून घ्या.