गेल्या काही वर्षांपासून देशातील टोल नाक्यांवर फास्टॅग सुरू करण्यात आला आहे. देशभरातील टोल प्लाझांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने नवीन वाहन खरेदी केले तर त्याला फास्टॅग घेणे आवश्यक आहे. हा फास्टॅग तुम्हाला गरजेनुसार रिचार्ज करावा लागतो. १ जानेवारी २०२१ पासून राष्ट्रीय महामार्गांवरच्या देशभरातल्या सगळ्या टोल नाक्यांवर (Toll Plaza) सर्व वाहनांकडून फास्टॅग पद्धतीनेच टोल स्वीकारणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सध्या देशात ८ कोटीपेक्षा जास्त लोक फास्टॅगचा वापर करतात.

आधुनिक टोल नियमांना गती देण्यासाठी फास्टॅगची व्यवस्था करण्यात आली. ज्यामुळे लोकांना ट्रॅफिक आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळाला. प्रत्येक टोल प्लाझावर रोखीने टोलचे पैसे घेतले जायचे तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होयची. मात्र फास्टॅगमुळे हे गर्दीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. जर तुम्ही सुद्धा कार चालवता असाल तर तुमच्याकडे फास्टॅग असणे आवश्यक आहे आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असताना तुमच्या फास्टॅगमध्ये रिचार्ज असणे आवश्यक आहे.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी

आता नुकतेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केलं. ३१ जानेवारीनंतर केवायसी न केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, ३१ जानेवारी पूर्वी फास्टॅगचे केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे, अशी घोषणा NHAI ने केली आहे. तुम्हाला फास्टॅग केवायसी वेळेनुसार अपडेट करावं लागणार आहे. अनेक वाहनचालक एकापेक्षा अधिक फास्टॅगचा वापर करतात. पण यापुढे असं करणं बेकायदेशीर असल्याचं नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने म्हटलं आहे. यापुढे प्रत्येक वाहनाला एकच फास्टॅग असणार आहे. आरबीआयच्या गाईडलाईन नुसार केवायसी अपडेट न केल्यास फास्टॅग बंद केलं जाणार आहे.

(हे ही वाचा : इथेनॉलवर चालणारी गाडी तुम्ही पाहिलीत का? कारसाठी खर्च किती? पर्यावरणपूरक आहे का? जाणून घ्या… )

फास्टॅग काय आहे?

फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी (RFID) तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. फास्टॅग ही एक अशी यंत्रणा आहे ज्याच्या मदतीने आपण आॅनलाइन टोल भरु शकतो. भारत सरकारने टोल घेण्यासाठी ही नवीन व मॉडर्न पद्धत साकारलेली आहे. ही यंत्रणा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अंतर्गत कार्यरत आहे. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो.

फास्टॅग कसे काम करते?

फास्टॅगला वाहनांच्या समोरच्या काचावर लावण्यात येतो, आणि या फास्टॅगमध्ये रेडिओ फ्रेक्विन्सी आडेंटिफिकेशन लागलेले असते. जेव्हा आपले वाहन टोल नाक्यांवर येते तेव्हा टोल वरील लागलेले सेंसर आपल्या वाहनांवर लागलेल्या फास्टॅगच्या संपर्कात येताच आपल्या फास्टॅग खात्यातून त्या टोल नाक्यावर लागणारा शुल्क कापण्यात येतो. तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कापले जातात.

वाहनावर लागलेलं फास्टॅग आपल्या प्रीपेड खाते सक्रिय होताच आपले कार्य सुरू करते आणि जेव्हा आपल्या फास्टॅग खात्यातील रक्कम संपते तेव्हा आपल्याला हे खाते रिचार्ज करावे लागते, जसे आपण आपल्या मोबाईलचे रिचार्ज करतो त्याचप्रमाणे फास्टॅगचे खाते सुध्दा रिचार्ज करावे लागते.

फास्टॅग कुठून खरेदी करावे?

तुमच्या कारसाठी फास्टॅग खरेदी करायचा असेल, तर तुमची ओळख कागदपत्रं आणि वाहनाची नोंदणी कागदपत्रं सादर करून काही ठराविक टोल नाक्यांवरून फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो. यासाठी केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. फास्टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात खरेदी करता येते. आरटीओ (RTO) कार्यालय, सेवा केंद्र, वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर आणि काही बँकांमध्ये फास्टॅग उपलब्ध करण्यात आले आहेत. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी विशेष विक्री केंद्र आहेत.

महामार्गावरील विक्रीच्या ठिकाणावरून फास्टॅग खरेदी करता येईल. तुम्ही ते कोणत्याही बँकेतून देखील खरेदी करू शकता, यामध्ये SBI, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, सिंडिकेट बँक यासारख्या नावांचा समावेश आहे. तुम्ही पेटीएम आणि ॲमेझॉनवरूनही ते खरेदी करू शकता.

फास्टॅग खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील?

फास्टॅग घेण्यासाठी तुम्हाला गाडीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC, गाडीच्या मालकाचा पासपोर्ट साईझचा फोटो आणि ड्रायव्हिंग लायसन्स लागेल. सोबतच कागदपत्रांवरील रहिवासी पत्त्याच्या पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्होटर आयडी देखील आवश्यक आहे. जर तुमच्याकडे दोन गाड्या असतील, तर तुम्हाला दोन्ही वाहनांसाठी वेगवेगळे फास्टॅग घ्यावे लागतील.

(हे ही वाचा : AWD vs 4WD: कार खरेदी करताय, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या… )

फास्टॅगचे रिचार्ज कसे करावे?

फास्टॅगच्या अकाऊंट वर आपण अनेक पध्दतीने रिचार्ज करू शकतो. आपण आपल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट-बँकिंग द्वारे फास्टटॅगचे रिचार्ज करू शकतो. फास्टॅग अकाऊंट मध्ये आपण कमीत कमी १०० रुपये ते जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकतो. पेटीएमवर फास्टॅगचे ऑनलाईन रिचार्ज करणे हे मोबाईलचे रिचार्ज करण्याएवढे सोपे आहे. फास्टॅग आयडी टाकून रिचार्ज करू शकता. आपण आपल्या पेटीएम वॉलेट, BHIM UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून रिचार्ज करू शकतो.

फास्टॅगच्या अकाऊंट वर आपण अनेक पध्दतीने रिचार्ज करू शकतो. आपण आपल्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट-बँकिंग द्वारे फास्टटॅगचे रिचार्ज करू शकतो. फास्टॅग अकाऊंट मध्ये आपण कमीत कमी १०० रुपये ते जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकतो. पेटीएमवर फास्टॅगचे ऑनलाईन रिचार्ज करणे हे मोबाईलचे रिचार्ज करण्याएवढे सोपे आहे. फास्टॅग आयडी टाकून रिचार्ज करू शकता. आपण आपल्या पेटीएम वॉलेट, BHIM UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून रिचार्ज करू शकतो.

फास्टॅग वैधता आणि रिचार्ज कसा करता येणार?

एका फास्टॅगची वैधता ५ वर्ष आहे. यामध्ये तुमच्या अकाऊंटमधील टोलची रक्कम आपोआप कापली जाते.

फास्टॅग वापरण्याचे फायदे

फास्टॅग वापरण्याचे अनेक फायदे आहेत. फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते. फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी. फास्टॅग असलेल्या खात्यातून रक्कम स्वयंचलितपणे वजा केल्यामुळे वेळ कमी घेतला जातो. फास्टॅग असलेल्या वापरकर्त्यास रोख व्यवहारासाठी टोल प्लाझावर थांबण्याची आवश्यकता नाही. ज्यामुळे इंधनाची बचत होते.

वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि कागदाचा वापरही केला जात नाहीज्यामुळे पर्यावरणाला फायदा होतो. खोळंबून राहिल्याने होणाऱ्या धुराचं प्रमाण कमी झाल्याने प्रदूषणही काहीसं कमी होण्यास मदत होते. टोल नाका मालकांना कमी मानवी संसाधने लागतात ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो आणि व्यवस्थापन देखील चांगले होते.

ऑनलाईन रिचार्ज सुविधा आहे. तुम्ही क्रेडिट कार्डडेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे घरी बसून फास्टॅगचे ऑनलाइन रिचार्ज सहज करू शकता. याचा वापर केल्याने टोल भरताना होणारा त्रास कमी होतो आणि महामार्गाचे व्यवस्थापन अधिक चांगले करता येते.

कार विकल्यानंतर फास्टॅगचं काय करायचं?

जर तुम्ही तुमचे वाहन विकले असेल आणि त्याचे कागदपत्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केले असेल, तर तुम्हाला तुमचा जुना फास्टॅग ताबडतोब निष्क्रिय/बंद करावा लागेल. अन्यथा, ती व्यक्ती तुमच्या फास्टॅगचा फायदा घेऊ शकते आणि पेमेंट करू शकते जे तुमच्या खात्यातून कापले जाईल. तसेच, जोपर्यंत तुम्ही तुमचे फास्टॅग खाते बंद करत नाही, तोपर्यंत तुमच्या कारचा नवीन मालक त्याच्या फास्टटॅग खात्यासाठी नोंदणी करू शकणार नाही.

जर तुम्ही कार विकणार असाल तर, तुम्हाला तुमच्या कारच्या विक्रीबाबत माहिती तुमच्या कारसाठी फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेला द्यावी लागेल आणि तुमचे खाते बंद करावे लागेल. त्याची संपूर्ण माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुम्हाला कार विकल्यानंतर फास्टॅग अकाउंट बंद करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो.

वाहन विषयक तज्ज्ञ ओंकार भिडे सांगतात, “गाडी विकल्यास फास्टॅग बंद करणे आवश्यक असते. यामुळे अनावश्यक फटका बसणे टाळता येते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.”

कारचे फास्टॅग खाते कसे निष्क्रिय करावे?

  • कोणताही FASTag निष्क्रिय करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे FASTag प्रदाता ग्राहक सेवाशी संपर्क साधणे. असे केल्याने, FASTag शी लिंक केलेले खाते बंद किंवा निष्क्रिय करण्याची विनंती केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या NHAI द्वारे सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन १०३३ वर कॉल करून तुम्ही फास्टॅग बंद होण्याच्या तक्रारी देखील नोंदवू शकता.
  • NHAI (IHMCL) सेवा वापरकर्ते १०३३ वर कॉल करून FASTag संबंधित सर्व तक्रारींची माहिती देखील मिळवू शकतात.
  • ICICI बँक वापरकर्ते १८००२१००१०४ वर कॉल करून FASTag निष्क्रिय करण्याच्या प्रक्रियेबद्दल सर्व माहिती मिळवू शकतात.
  • पेटीएम वापरकर्ते १८००१२०४२१० वर कॉल करून त्यांचे FASTag खाते बंद करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.
  • अॅक्सिस बँकेचे वापरकर्ते त्यांचे FASTag खाते निष्क्रिय करण्यासाठी १८००४१९८५८५ वर कॉल करू शकतात.
    HDFC बँकेचे वापरकर्ते १८००१२०१२४३ वर संपर्क करून FASTag बंद करण्यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकतात.
  • एअरटेल पेमेंट्स बँक वापरकर्ते खाते निष्क्रिय करण्यासाठी ८८००६८८००६ वर कॉल करून FASTag बंद करण्यासंबंधी माहिती मिळवू शकतात.

Story img Loader