Shreyas Talpade’s car collection: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शुटींग संपून घरी गेल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागले. तो जागीच कोसळला. त्याला त्याची पत्नी दिप्तीने तातडीने अंधेरीतील रुग्णालयात नेले. अवघ्या ४७ व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. अँजिओप्लास्टीनंतर त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक वेळ अशी होती की श्रेयस तळपदेकडे बसचे भाडे भरण्यासाठी पैसे नव्हते. याच कारणामुळे श्रेयसलाही बसने स्टुडिओत जाता आले नाही. पण आज तो आलिशान गाड्यांचा मालक आहे. आज त्यांची कमाई करोडोंमध्ये आहे. श्रेयसने आतापर्यंत मराठी रंगभूमी, छोटा पडद्यावर तसेच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याने त्याच्या आतपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ४५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. श्रेयस तळपदे हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता तसेच व्यापारी आहे. सन २०२१ मध्ये त्यांनी नाइन रास नावाचे ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केले. श्रेयस तळपदेकडे आलिशान गाड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. चला तर पाहूया कोणकोणत्या कारचा संग्रह श्रेयस तळपदेकडे आहे.

(हे ही वाचा : अनेक कंपन्यांचे वाढले टेन्शन, Honda ची Mid-Size SUV घेण्यासाठी उडाली झुंबड, १०० दिवसांत विकल्या २० हजाराहून अधिक कार )

श्रेयस तळपदे कार कलेक्शन

Mercedes Benz

अभिनेता श्रेयस तळपदेकडे महागडी Mercedes Benz लग्झरी कार असल्याची माहिती आहे. या कारची किंमत ९४ लाख रुपये असल्याची माहिती आहे. तर त्याच्याकडे त्याच्याकडे Mercedes-Benz GLS ही महागडी कार देखील असून या कारची किंमत १.१६ कोटी रुपये आहे.

Honda Accord

महागड्या कार कलेक्शनमध्ये श्रेयस तळपदेकडे Honda Accord कार देखील आहे. या कारची किंमत ३५ लाख रुपये आहे.

Audi Q7

अभिनेत्याकडे Audi ची Audi Q7 ही एक अतिशय आलिशान आणि लक्झरी एसयूव्ही आहे. तसेच यामध्ये अतिशय पॉवरफुल इंजिन देखील वापरण्यात आले आहे.

Audi A8 L

लग्झरी कार कंपनी ऑडीची नवीन सेडॉन कार ‘ऑडी ए8एल’ ही श्रेयस तळपदेकडे आहे. या कारची किंमत १.२३ कोटी इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpades car collection his high end car collection includes audi and mercedes benz pdb