आपल्या गाडीच्या सुरक्षेसाठी, तसेच रस्त्यावर वाहन चालविताना दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या घटना टिपून ठेवण्याचे काम डॅश कॅमच्या साह्याने होते. गाडीला अपघात झाल्यास किंवा विम्यादरम्यान तुमची चूक नसल्याचा पुरावा दाखविण्याची वेळ आल्यास या डॅश कॅमची खूप मदत होऊ शकते. सध्या जवळपास सर्व गाड्यांमध्ये असा कॅमेरा बसविण्यात आल्याचे आपल्याला दिसते.
सगळ्याच दृष्टीने गाडीमधे बसविण्यात येणाऱ्या या कॅमेऱ्याला महत्त्व आहे, असे आपण म्हणू शकतो. मात्र, तुमच्या वाहनामध्ये, गाडीमध्ये असा डॅश-कॅम बसविला नसल्यास तो तुम्ही कसा बसवू शकता, याबद्दल हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखामध्ये माहिती दिली आहे. ती पाहू. डॅश-कॅम ऑनलाइन किंवा दुकानामध्ये आपल्याला मिळू शकतो.
हेही वाचा : Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा
गाडीमध्ये डॅश-कॅम कसा बसवावा?
१. चार्जिंग करणे
गाडीमध्ये डॅश-कॅम बसविण्याआधी त्याची बॅटरी तपासून घ्या. बॅटरी जर कॅमेऱ्याच्या आत बसवली असेल, तर तिला इन्स्टॉल करण्याआधी चार्ज करून घ्यावी. तसेच गाडीमध्ये १२V चार्जिंग पोर्ट बसवून घ्या. परंतु, जेव्हा आपण आपले वाहन बंद करून ठेवतो तेव्हा आपसूकच हे १२V सॉकेटदेखील बंद होते. मात्र, डॅश-कॅममधील बॅटरी सुरू राहून, ती तिचे काम करत राहते.
२. योग्य जागा शोधणे
गाडीमध्ये चालकाच्या किंवा बाजूच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीच्या एक हात अंतरावर हा डॅश-कॅम बसविण्याची योग्य जागा असते. मात्र, हा कॅमेरा गाडी चालवता मधेमधे येणार नाही, त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर गाडीच्या रिअर व्ह्यू आरशाला अथवा गाडीच्या डॅशबोर्डला हा कॅमेरा बसविता येऊ शकतो. तुम्ही कुठेही या कॅमेऱ्याला इन्स्टॉल केल्यानंतर गाडी चालविताना त्याचा अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
हेही वाचा : Car tips : सेकंड हॅण्ड गाडी विकत घेताय? मग कायम लक्षात ठेवा या पाच टिप्स….
३. केबलची लांबी तपासावी
तुम्हाला हव्या त्या ठिकाणी डॅश-कॅम बसविण्याआधी त्याच्या केबल/वायरची लांबी तपासून पाहा. कॅमेरा बसविल्यानंतर ती वायर व्यवस्थित तुमच्या १२V सॉकेटपर्यंत पोहोचेल याची खात्री करा. डॅश-कॅम यूएसबी पोर्टसह येतो. मात्र, गाडीचा तो यूएसबी पोर्ट हा केवळ फोनच्या वापरासाठी असून, डॅश-कॅम १२V सॉकेटच्या मदतीनेच चार्ज करावा.
४. डॅश-कॅमची वायर लपवणे
आपल्या डॅश-कॅमची वायर कॅमेरा बसविताना, विंडशिल्डच्या बाहेरून बसवावी. असे करताना तुम्ही त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिकट क्लिप्सचा वापर करू शकता. तुम्ही वायर योग्य पद्धतीने जोडत असल्याची एकदा खात्री करा. वायर व्यवस्थित बसविल्यानंतर डॅश-कॅम तुमच्या डॅशबोर्ड, रिअर व्ह्यू आरसा किंवा विंडशील्डवर लावून घ्यावा.
या चार टिप्सचा वापर करून, तुमच्या गाडीमध्ये डॅश-कॅम बसवू शकता.