सिंपल एनर्जीने जाहीर केले आहे की, त्यांची फ्लॅगशिप स्कूटर सिंपल वनची डिलिव्हरी जून २०२२ पासून सुरू होईल. कंपनीला आतापर्यंत ३०,००० हून अधिक ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की सिंपल वन पूर्ण चार्ज झालेल्या बॅटरीसाठी इको मोडमध्ये २०३ किमी आणि IDC मध्ये २३६ किमीची कमाल रेंज देणारी आहे. ही स्कूटर २.९५ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-४० ते १०५ किमी प्रतितास वेग पकडू शकते.
सिंपल एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरचे फिचर्स
Simple One च्या फिचर्सबद्दल सांगायचं झालं तर, कंपनीने १२ इंच टायरसह ३० लिटरची बूट स्पेस दिली आहे. स्कूटरमध्ये ७ इंचाचा डिजिटल डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये नेव्हिगेशन, जिओ फेन्सिंगचा समावेश आहे. SOS मेसेज, डॉक्युमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखी फिचर्स उपलब्ध आहेत.
Simple Energy इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत
सिंपल वन स्कूटर ही देशातील सगळ्यात जास्त रेंजची स्कूटर आहे, ज्याची कंपनीने सुरुवातीची किंमत १.१० लाख रुपये ठेवली आहे, ज्या ग्राहकांना ही स्कूटर खरेदी करायची आहे, ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती बुक करू शकतात. कंपनीने या स्कूटरच्या बुकिंगसाठी १,९४७ रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे आणि ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल ठेवण्यात आली आहे म्हणजे बुकिंग रद्द केल्यावर कंपनी तुम्हाला संपूर्ण टोकन पैसे परत करेल.
आणखी वाचा : फक्त ६० हजारात घरी न्या Maruti SPresso VXI CNG कार, आर्थिक मंदीमध्ये सुद्धा बेस्ट ऑप्शन; बघा EMI किती?
ही स्कूटर किती किमीची रेंज देते?
या स्कूटरच्या रेंज आणि स्पीडबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, एकदा ही स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर इको मोडमध्ये २०३ किमी आहे आणि IDC म्हणजेच भारतीय ड्राइव्ह सायकल कंडिशनमध्ये २३६ किमी आहे. सोबतच १०५ kmph चा टॉप स्पीड आणि ३.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रतितास आणि २.९५ सेकंदात ० ते ४० किमी प्रतितास वेग मिळवू शकते.
आणखी वाचा : ओकायाच्या नव्या ई-स्कूटरसाठी बुकिंग सुरू, 200km ची रेंज, 70kmph ची टॉप स्पीड आणि बरंच काही…
Simple Energy इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी
सिंपल वनच्या बॅटरीबद्दल सांगायचं झालं तर, या कंपनीने स्कूटरमध्ये ४.८ kWh क्षमतेचा पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. ती चार्ज करू शकते आणि २.५ किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.