सध्या थंडीचे दिवस सुरू असले तरीही आपल्या देशात अनेक भागांमध्ये दरवर्षीपेक्षा थंडीचा कडाका अधिक प्रमाणात आहे. त्याचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होतो, तसाच तो गाडीच्या तब्येतीवरसुद्धा होत असतो. आपल्या जसा सर्दी-खोकला किंवा घसा खवखवण्याचा त्रास होतो तसाच. गाडी सुरू केल्यानांतर ती नुसतीच काही वेळासाठी आवाज करीत राहते.

अशा वेळेस कदाचित गाडीमधील काही पार्ट्स बदलण्याची आवश्यकता असू शकते. त्यामुळे गाड्यांचा मेंटेनन्स करण्यासाठी किंवा मेकॅनिककडे घेऊन जाण्याची गरज आहे की नाही हे कसे तपासायचे त्याची माहिती ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या एका लेखावरून मिळाली.

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…

हेही वाचा : Optimus robot घालतोय कपड्यांच्या घड्या; पाहा एलॉन मस्कने शेअर केलेला ‘हा’ भन्नाट व्हिडीओ….

हिवाळ्यात गाडी तपासण्याच्या टिप्स

१. गाडीचे दिवे तपासून पाहणे

हिवाळ्यामध्ये दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे गाडीच्या दिव्यांचा प्रकाश प्रखर असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या वाहनाचे सर्व दिवे तपासून पाहा. जर गाडीचा प्रकाश कमी वाटत असेल किंवा ती फ्लिकर करीत असल्यास नेहमीच्या अथवा जवळच्या मेकॅनिकला दाखवून घ्या.

२. कार बॅटरी तपासणे

आपल्या गाडीमधील सर्व यंत्रणा ही बॅटरीच्या साह्याने सुरू असते. असे असताना जर बॅटरीची पॉवर कमी झाली असेल, तर ती उन्हाळ्यामध्ये त्रास देणार नाही; मात्र थंडीच्या दिवसांत अशी बॅटरी लवकर संपून जाण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जायचा विचार करीत असाल, तर गाडीमधील सर्व गोष्टी योग्य रीतीने काम करीत आहेत की नाही ते तपासून घ्या. काही गडबड वाटल्यास, मेकॅनिककडे जाऊन बॅटरी तपासून घ्या.

३. इंजिन ऑइल आणि कूलंट

गाडी बऱ्याच किलोमीटर अंतराचा प्रवास करीत असल्यास तुम्ही केवळ गाडीमधील इंजिन ऑइल किंवा कूलंट न बदलता, नवीन ऑइल भरत राहिलात, तर गाडी किंवा इंजिनाची काळजी ते घेणार नाही. हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये हलक्या घनतेच्या इंजिन ऑइलचा वापर करणे योग्य असते.

त्यासाठी तुम्ही गाडीच्या मॅन्युअलमध्ये दिलेली माहिती आणि गाडी बनवणाऱ्या कंपनीने कोणत्या वातावरणासाठी, कोणत्या तापमानाचे इंजिन ऑइल, कूलंटचे प्रमाण दिले आहे ते वाचून, त्याप्रमाणे इंजिन ऑइल गाडीमध्ये टाकावे.

हेही वाचा : Car tips : गाडी सारखी बंद पडत आहे? मग वाहनातील ‘हा’ भाग बदलण्याचा संकेत असू शकतो; पाहा….

४. विंडशिल्ड आणि वायपर्स

गाडीत बसल्यानंतर समोरचे दृश्य आपल्याला स्पष्टपणे दिसण्यासाठी विंडशिल्ड आणि त्यावर बसवलेले वायपर्स मदत करतात. पावसाळा असो किंवा हिवाळा; काचेवरील पाण्याचे थेंब, बर्फ, दव काढून टाकण्यास हे वायपर्स आपल्याला मदत करतात. त्यामुळे अगदी किरकोळ वाटत असले तरीही विंडशिल्ड आणि वायपर्स महत्त्वाचे आहेत. म्हणून ते योग्य रीतीने काम करीत नसल्यास शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्यावेत.

५. डीफ्रॉस्टर आणि क्लायमेट कंट्रोलर तपासून घ्या

गाडीच्या काचांवर बाष्प जमू नये यासाठी गाडीमधील डीफ्रॉस्टर आणि क्लायमेट कंट्रोलची मदत होत असते. त्यामुळे हिवाळ्यात या दोन्ही यंत्रणा योग्यरीत्या काम करीत आहेत ना हे तपासून पाहा.

६. टायर

गाडी चालवताना अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे गाडीची चाके व टायर. त्यांची योग्य रीतीने काळजी न घेतल्यास किंवा टायरमधील हवेचे प्रमाण योग्य नसल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात रस्ते ओले असतात. त्यांवर दव पडलेले असते; अशात तुम्ही गाडी चालवताना टायर व्यवस्थित नसल्यास गाडी घसरण्याची किंवा सरकण्याची भीती असते. त्यामुळे वेळोवेळी हवा भरून घेणे, टायर बदली करून घ्यावे.

७. गाडीचे ब्रेक्स

तुम्ही वाहन चालवताना, वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक किती महत्त्वाचे असतात हे वेगळे सांगायला नको. मात्र, ब्रेक्स सैल असतील, पटकन ब्रेक लागत नसतील, तर अपघात होऊ शकतत. त्यामुळे वेळोवेळी मेकॅनिककडे जाऊन ब्रेक्स तपासून, काही खराबी असल्यास वेळीच ते दुरुस्त करून घ्यावेत.

Story img Loader