प्रत्येकालाच आपल्याकडे स्वतःची फोर व्हीलर असावी असे वाटत असते. भारतात अशा अनेक फोर व्हीलरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. त्या प्रत्येकवेळी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. अशाच एका वाहन उत्पादन करण्यात अग्रगण्य असणाऱ्या स्कोडा कंपनीने Octavia RS iV तयार केली आहे. स्कोडा कंपनी ही गाडी २०२३ वर्षाच्या शेवटी लाँच करणार आहे. skoda कंपनी २०२३ च्या शेवटी भारतातील आपले पहिले plug in hybrid Octavia RS iV गाडी लाँच करणार आहे. हे मॉडेल Octavia RS iV चे चौथे जनरेशन असणार आहे.
जाणून घेऊयात Skoda Octavia RS iV चे फिचर्स
Skoda Octavia RS iV या मॉडेलमध्ये मागील RS मॉडेल्ससारखीच भरपूर फीचर्स देण्यात आलेली आहेत. बाहेरील बाजूला black grille(ब्लॅक ग्रील), sharp fog lamp housings(शार्प फॉग लॅम्प हाऊसिंग्स ), black finish air inlets(ब्लॅक फिनिश एअर इन्लेट्स ) and sportier bumpers(स्पोर्टीयर बंपर्स ) असे फिचर्स या मध्ये देण्यात आले आहेत.
तसेच रीअरव्ह्यू मिररच्या बाहेर ब्लॅक फिनिशिंग पाहायला मिळते. ज्यामुळे गाडीला एक वेगळाच लुक प्राप्त होतो. गाडीच्या इंटेरिअरमध्ये , स्किडप्लेट्सवर ग्लॉसी फिशिंग करण्यात आले आहे. तसेच टेक्नॉलॉजी मध्ये १० इंची टचस्क्रीन एलईडी स्क्रीन देण्यात आला आहे.गाडीच्या कामगिरीबद्दल जाणून घ्यायचे झालेच तर या मॉडेलचे इंजिन 1.4-लिटर चार-सिलेंडर TSI चे आहे. यामध्ये १५० hp चे output असून जर ते ११६ hp क्षमता असणाऱ्या इलेट्रीक मोटर्सही याला जोडले तर यातून निघणारे output हे २४५ hp इतके आहे. 400 Nm of peak torque हे जुन्या मॉडेलपेक्षा अधिक सक्षम आहे. Skoda Octavia RS iV 7.3 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग वाढविण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
PHEV चे एकूण वजन 1,620 kg आहे. यामध्ये अनेक विविध ड्रायव्हिंग मोडस येतात. या गाडीची किंमत साधारणपणे 45ते 50 लाख इतकी असणार आहे.