चेक रिपब्लिक देशातली लग्झरी वाहन उत्पादक कंपनी स्कोडा भारतीय वाहन बाजारपेठेत जबरदस्त कामगिरी करत आहे. आता स्कोडाने भारतीय बाजारात आपली ‘स्कोडा कुशक एसयूव्हीची अॅनिव्हर्सरी एडिशन’ भारतात सादर केली असून ही कार आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया कारची खासियत काय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारची वैशिष्ट्ये
कुशकच्या अॅनिव्हर्सरी एडिशनला स्टँडर्ड मॉडेलप्रमाणेच बाह्य रंगाचे पर्याय मिळतात. तथापि, या विशेष आवृत्तीमध्ये, कुशकला सी-पिलर आणि स्टीयरिंग व्हीलवर ‘अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन’ बॅज मिळतो, त्याशिवाय दरवाजाच्या काठावर नवीन संरक्षक, नवीन कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि क्रोम ऍप्लिक दारांच्या पायावर आहे.

स्कोडा ने अॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह १०-इंच टचस्क्रीन सादर केली आहे. कंपनीने स्टँडर्ड मॉडेलमध्ये सर्व सुरक्षा फीचर्स दिले आहेत. या आवृत्तीतील स्कोडा कुशक ट्रॅक्शन कंट्रोल, सहा एअरबॅग्ज, ईएससी, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. कुशक ५-स्टार GNCAP सुरक्षा रेटिंगसह येते.

आणखी वाचा : दिवाळी बंपर धमाका: TVS च्या ‘या’ बाईकवर भरघोस डिस्काउंट; आणखी मिळणार बरचं काही…

इंजिन
स्कोडा कुशक अॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये १.०-लिटर आणि १.५-लिटर दोन्ही इंजिनमध्ये अॅनिव्हर्सरी एडिशन ऑफर करण्यात आले आहे. १.०-लिटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल पेट्रोल इंजिन ११५ Bhp पॉवर आणि १७५ एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन पॅडल शिफ्टरसह ६-स्पीड स्वयंचलित आणि मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात फ्रंट बंपर, सनरूफ आणि १७-इंच अलॉय व्हील आणि फॉक्स डिफ्यूझर फ्रंट बंपर, सनरूफ आणि फॉक्स डिफ्यूझरवर कायम ठेवण्यात आले आहेत.

किंमत
कुशक अॅनिव्हर्सरी एडिशन १५.५९-१९.०९ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणण्यात आले आहे. या एडिशनमध्ये एकूण ४ व्हेरियंट आणण्यात आले असून प्रत्येकाची किंमत संबंधित बेस मॉडेलपेक्षा ३०,००० रुपये जास्त आहे.