स्कोडाचं ही Onyx नावासह खास नातं आहे असे दिसते. मध्यम आकाराची सेडान बंद होण्यापूर्वी लॉन्च केलेले रॅपिड ओनिक्स (Rapid Onyx ) व्हर्जन लक्षात आहे का. काही महिन्यांपूर्वी, Skoda ने Kushaq ची Onyx व्हर्जन भारतात लॉन्च केली होती. तेव्हा ती फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह बाजारात आली होती.
झेक कार निर्मात्याने (Czech carmaker आता Kushaq च्या Onyx व्हर्जन चे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. १३.४९लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत, Kushaq Onyx अॅक्टिव्ह आणि ॲम्बिशन ट्रिम्समध्ये उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा – Monsoon Bike Riding: मान्सूनमध्ये लाँग ड्राईव्हला जाताय? मग आधी ‘हे’ वाचाच; प्रवास होईल सुखकर
Skoda Kushaq Onyx: नवीन काय आहे?
जरी डिझाइन उर्वरित व्हर्जनसारखे असले तरी, Kushaq Onyx व्हर्जनला एक विशिष्ट ओळख देणारी अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत. बाहेरील बाजूस, हाय-स्पेक ॲम्बिशन ट्रिमप्रमाणेच LED DRLs आणि कॉर्नरिंग फॉग लॅम्पसह LED हेडलाइट सेटअप मिळतो. ॲम्बिशन ट्रिमच्या विरुद्ध Onyx एडिशन १६ इंच स्टीलच्या चाकांवर फिरते.बी पीलरवरील Onyx badge वेगळेपणामध्ये आणखी भर घालत आहे
तुम्ही specific exterior body decals देखील निवडू शकता. केबिनला ओनिक्स बॅजिंग मेटलिंग प्लेट्ससह नक्षीदार दरवाजाच्या सिल्स जोडले आहे. त्याचप्रमाणे, ओनिक्स ब्रँडिंग फ्लोअर मॅट्स आणि कुशनवर देखील आढळू शकते. Onyx आवृत्तीमध्ये आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे स्वयंचलित हवामान नियंत्रण युनिटसाठी टच पॅनेल आहे. ऑफरवरील इतर वैशिष्ट्यांमध्ये पॅडल शिफ्टर्स, हिल होल्ड कंट्रोल आणि डिफॉगरसह मागील वायपर यांचा समावेश आहे, ही वैशिष्ट्ये हाय-स्पेक ॲम्बिशन ट्रिमसाठी राखीव आहेत.
हेही वाचा – बचतची मोठी संधी! टाटा मोटर्सच्या ‘या’ कारवर मिळतेय भन्नाट ऑफर
Skoda Kushaq Onyx: इंजिन स्पेक
Kushaq Onyx केवळ १.०-लिटर TSI तीन-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे जे ११४ bhp आणि १७८ Nm पीक टॉर्क बनवते. नवीनतम अपडेटसह ६-स्पीड मॅन्युअल तसेच ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.