Skoda Auto: झेक प्रजासत्ताकची आघाडीची कार कंपनी स्कोडा ऑटोने (Skoda Auto) भारतातली आपली लेटेस्ट मिड-साइज स्कोडा कुशक (SUV Skoda Kushaq) च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. स्कोडा कुशकच्या किंमती प्रकारानुसार ६०,००० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. स्कोडाच्या किमतीत वाढ होण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी कंपनीने दोनवेळा किमतीत वाढ केली होती. या मध्यम आकाराच्या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत आता ११.५९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १९.६९ लाख रुपयांपर्यंत जाते. या वाढलेल्या किंमतीची यादी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर पाहू शकता.

स्कोडा कुशकचे फीचर्स

स्कोडाच्या कुशकमध्ये सिंगल-पॅनोरामिक सनरूफ, आठ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, सहा स्पीकर, ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्टाइल आणि मॉन्टे कार्लो व्हेरिएंटमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय यात अनेक सेफ्टी फीचर्सही देण्यात आली आहेत. यात १.५-लीटर टीएसआय मोटर देखील मिळते जी जास्तीत जास्त १४८ एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ७-स्पीड DSG ला जोडलेले आहे.

आणखी वाचा : SUV कारच्या सर्वाधिक विक्रीत ‘ही’ कार अव्वल; जाणून घ्या वैशिष्ट्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्कोडा इंडियाने नुकतीच आपली ॲनिव्हर्सरी एडिशनही सादर केली आहे. लाइनअपच्या सध्याच्या टॉप-स्पेक स्टाइल प्रकारावर आधारित, नवीन स्कोडा कुशक ॲनिव्हर्सरी एडिशन चार वेगवेगळ्या पॉवरट्रेन कॉम्बिनेशनसह उपलब्ध आहे.