Skoda Kylaq booking open: स्कोडाने आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Kylaq फक्त ७.८९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करून बाजारात खळबळ माजवली आहे. या कार लाँचमुळे मारुती सुझुकी, ह्युंदाई, किया, टाटा आणि महिंद्रासारख्या कार कंपन्या तणावाखाली आल्या आहेत. नवीन स्कोडा Kylaq ची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चांगली बातमी म्हणजे आजपासून म्हणजेच २ डिसेंबरपासून कंपनी दुपारी ४ वाजल्यापासून या कारची बुकिंग सुरू करत आहे. या एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतीही आज जाहीर केल्या जाणार आहेत. त्याची डिलिव्हरी कधी सुरू होईल, हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२ डिसेंबरपासून बुकिंग सुरू (Skoda Kylaq booking starts)

नवीन Skoda Kylaq चे बुकिंग आज संध्याकाळी ४ वाजता सुरू होत आहे. तर या कारची डिलिव्हरी २७ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. तुम्हाला ही SUV पाहायची असेल आणि अनुभवायची असेल तर ती जानेवारीमध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी २०२५ मध्येही दाखवली जाईल, जिथे तुम्हाला या कारबद्दल अधिक माहिती मिळेल. चला जाणून घेऊया या SUV चे फीचर्स आणि इंजिन…

हेही वाचा… ‘या’ स्कूटरने केलं मार्केट जाम! खरेदीसाठी शोरूमच्या बाहेर झाली ग्राहकांची गर्दी, ठरली वर्षातील सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर

डिझाइन, इंटीरियर आणि फीचर्स (Skoda Kylaq Features)

नवीन Skoda Kylaq स्पोर्टी आणि स्टायलिश दिसते. ती आकाराने कॉम्पॅक्ट आहे. त्याचा पुढचा आणि मागचा लूक कुशाकसारखाच आहे, परंतु प्रोफाइलमुळे ती लहान दिसते. यात १७-इंच अलॉय व्हील आहेत, ज्यामुळे कारची डिझाइन अधिक चांगली दिसते. याशिवाय ही कार सहा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे, ज्यात नवीन लावा ब्लू, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर आणि कँडी व्हाइटसह नवीन ऑलिव्ह गोल्ड यांचा समावेश आहे.

प्रीमियम इंटीरियर, उत्तम सेफ्टी फीचर्स (Skoda Kylaq Safety Features)

नवीन Skoda Kylaq चे इंटीरियर खूप प्रीमियम आहे. यात ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि कँटनमधील ६-स्पीकर साउंड सिस्टम यांसारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे. सगळ्या व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, Isofix चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि तीन-पॉइंट सीट बेल्ट आहेत.

हेही वाचा… गुगल मॅप्सच्या या ट्रिकने तुम्हाला कधीच चलन भरावे लागणार नाही, जाणून घ्या हा जुगाडू हॅक

दमदार इंजिन (Skoda Kylaq Engine)

नवीन Skoda Kylaq मध्ये 1.0-litre TSi पेट्रोल इंजिन आहे, जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. या एसयूव्हीकडून मोठ्या प्रमाणावर विक्री आणि टियर-3 आणि टियर-4 शहरांमध्ये पोहोचण्याची कंपनीची अपेक्षा आहे.

Kylaq ही Skoda साठी अतिशय खास कार आहे, कारण ती कंपनीला एका दशकानंतर १० लाख रुपयांपेक्षा कमीच्या सेगमेंटमध्ये परत आणेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skoda kylaq booking starts from 2 december today know suv delivery date features engine and specifications dvr