Skoda Kylaq SUV launched In India : स्कोडा इंडियाने भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलाक (Skoda Kylaq) लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत आहे. ही बोल्ड आणि मॉडर्न एसयूव्ही भारतीय कार खरेदीदारांना तिच्या आकर्षक डिझाईन आणि टॉप-टायर फीचर्ससह आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. Skoda Kylaq ही नवीन गाडी २ डिसेंबरपासून बुकिंगसाठी उपलब्ध असेल. तसेच २७ जानेवारी २०२५ पासून तिची डिलिव्हरी देण्यास सुरुवात होईल.

स्कोडा कायलाक (Skoda Kylaq ) मुस्कलर एक्सटेरिअर आणि मॉडर्न स्टायलिंगमुळे लक्ष वेधून घेते. Skoda Kylaq MQB-IN प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. तसेच फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी २५ पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करण्यात आली आहे. आत Kylaq एक इलेक्ट्रिक सनरूफ, ४४६ लीटर बूट स्पेस (spacious 446-litre boot) देते. त्यात १७-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील आहेत आणि त्यामुळे गाडीच्या प्रीमियम लूकमध्ये अधिक भर पडते.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

सब-४ मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेग्मेंटमध्ये दाखवेल जलवा :

स्कोडा ऑटोने Kylaq आज लाँच केली आहे. सध्या चार मीटरपेक्षा लहान एसयूव्ही सर्वाधिक विकल्या जातात. स्कोडा ऑटो इंडिया आतापर्यंत कुशाकच्या माध्यमातून मिडसाईज एसयूव्ही आणि स्लाव्हियाद्वारे मिडसाईझ सेडान सेग्मेंटमध्ये सक्रिय होती. आता Skoda ने Kylaq प्रथमच सब-4 मीटर SUV सेग्मेंटमध्ये प्रवेश केला आहे. स्कोडा लाइनअपमधील ही सर्वांत परवडणारी एसयूव्ही आहे आणि ती फक्त पेट्रोलवर उपलब्ध असेल. या गाडीला १-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे आणि मॅन्युअल, ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशन अशा पर्यायांमध्ये ती उपलब्ध आहे. Skoda Kylaq कुशाक आणि स्लाव्हियाप्रमाणे ११४ बीएचपी आणि १७८ एनएम टॉर्कचे आउटपुट देते. टर्बो पेट्रोल इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्स्मिशनशी जोडलेले आहे.

हेही वाचा…Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स

Skoda Kylaq मध्ये १० इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, आठ इंचांचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पॅनल सनरूफ, एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्ही सहा पद्धतीने इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकणार आहात…

Kylaq मध्ये सहा एअरबॅग्ज, ट्रॅक्शन व स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन, ब्रेक डिस्क वायपिंग, रोल ओव्हर प्रोटेक्शन, मोटर स्लिप रेग्युलेशन, इलेक्ट्रॉनिक डिफरन्शियल लॉक, पॅसेंजर एअरबॅगसह एक्टिव्हेशन, मल्टी कोलिजन ब्रेकिंग, ISOFIX सीट्स आदी २५ वैशिष्ट्यांचा यात समावेश आहे.