Skoda Kylaq vs Maruti Brezza Engine Compare: चेक रिपब्लिक ऑटोमोबाईल निर्माता कंपनी स्कोडा लवकरच त्यांच्या नवीन एसयूव्हीसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. स्कोडा आता देशातील सर्वात प्रसिद्ध सब-फोर मीटर कार विभागात धमाकेदार एंट्री करणार आहे. स्कोडा पुढील महिन्यात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq सादर करणार आहे. बाजारात आल्यानंतर ही कार अनेक मॉडेल्सना टक्कर देईल.
नवीकोरी Skoda Kylaq ही मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV 3X0, Hyundai Venue, Kia Sonet, आणि Nissan Magnite या सब-4 मीटर SUV रेंजमधील सर्वात नवीन ॲडिशन असेल. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्कोडाला फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपली बाजू तगडी ठेवावी लागणार आहे.
हेही वाचा… दिवाळीत सीएनजी कार घेताय? ‘या’ आहेत बजेटमधील टॉप १० सीएनजी कार्स, मायलेज पाहून लगेच खरेदी कराल
असे म्हटले जाते की, या एसयूव्हीच्या सेगमेंटमधील सगळ्यात बेस्ट-सेलर कार जर कोणती असेल तर ती मारुती सुझुकी ब्रेझा आहे, ज्याची भारतात बऱ्याच काळापासून मागणी आहे. म्हणूनच आगामी स्कोडा Kylaq आणि मारुती सुझुकी ब्रेझा यांच्या इंजिन स्पेसिफिकेशनच्या तुलनेबद्दल जाणून घेऊया.
Skoda Kylaq vs Maruti Suzuki Brezza: इंजिन स्पेसिफिकेशन
स्लाव्हियासारखंच फॅमिलिअर इंजिन Skoda Kylaq वापरते, जी 1.0-लिटर टर्बो पेट्रोल युनिट देते. इंजिन मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मारुती सुझुकी ब्रेझा एक माईल्ड-हायब्रिड 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरते, जे मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक टॉर्क कन्वर्टर गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
इंजिन स्पेसिफिकेशन | Kylaq | Brezza |
डिस्प्लेसमेंट | 1.0-लिटर टर्बो पेट्रोल | 1.5-लिटर माईल्ड-हायब्रिड |
पॉवर | 114bhp | 102bhp |
टॉर्क | 178Nm | 138Nm |
गिअरबॉक्स | MT/AT | MT/AT |
वरील नंबर्सचा विचार करता, Kylaq ला विस्थापनाचे तोटे आहेत (displacement disadvantage), तरीही त्याची पॉवर आणि टॉर्क मारुती सुझुकी ब्रेझाच्या तुलनेत अधिक आहे. टर्बोचार्जिंग Kylaq साठी फायद्याचं आहे, तर ब्रेझामधील नॅचरली अॅसपिरेटेड (NA) इंजिनदेखील एक सुखद अनुभव आहे.
हेही वाचा… चर्चा तर होणारच! ‘या’ स्वस्त एसयूव्हीवर अख्खा देश फिदा, एअरबॅग्जसह आहेत ‘हे’ दमदार सेफ्टी फिचर्स
Skoda Kylaq कधी लॉंच होणार
कंपनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतात Skoda Kylaq लाँच करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ही एसयूव्ही अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच केली जाईल. त्याचवेळी त्याच्या किमतीही जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. तरी लॉंच केल्यानंतर याची सुरुवातीची किंमत सुमारे ८.५० लाख रुपये इतकी असू शकेल, अशी चर्चा आहे. जर मारुती ब्रेझाच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत ८.३४ लाख रुपयांपासून सुरू होते.