Skoda SUV Launch Date :भारतीय बाजारपेठेत मिडसाईज आणि फुलसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कुशाक आणि कोडियाकसारख्या प्रभावी वाहनांसह ग्राहकांना खूश करणारी स्कोडा ऑटो इंडिया लवकरच सब-४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तर आता स्कोडाच्या एसयूव्हीची (Skoda SUV) लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणारी ही पहिली ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे. या सेगमेंटमध्ये, Skoda Kylaq मारुती ब्रेझा, Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV 3XO आणि Tata Nexon आदी कंपन्यांना टक्कर देणार आहे. तर सब-कॉम्पॅक्ट SUV कधी लाँच होणार? यात कोणते नवीन फीचर्स असणार जाणून घेऊ या…
स्कोडाची नवीन Kylaq ६ नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. कंपनी फक्त टर्बो पेट्रोल इंजिन असलेली, भारतात तयार केलेली वाहने ऑफर करतो, त्यामुळे कॉम्पॅक्ट (Skoda SUV) ११४ बीएचपी आणि १७८ एनएम टॉर्कच्या आउटपूटसह इतर गाड्यांप्रमाणे यातही एक लिटर इंजिन दिले जाऊ शकते, ज्यामध्ये टर्बो इंजिन तीन सिलेंडरसह दिले जाईल. हे ६ स्पीड मॅन्युअल किंवा ६ स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह जोडले जाईल. कुशाक, स्लाव्हियाप्रमाणे, नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही MQB-A0 IN आर्किटेक्चरवर आधारित आहे.
फीचर्स :
नवीन एसयूव्ही एंट्री-लेव्हल मॉडेल्ससाठी 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह 10-इंच डिस्प्लेसह येईल. हे फीचर्स स्लाव्हिया, Kushaq सारखे असतील. याशिवाय समोर हवेशीर जागा, ऑटोमॅटिक पॅडल शिफ्टर्स, सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल, ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट, एलईडी एल आकाराच्या लाईट्सदेखील असेल. याचबरोबर सहा एअरबॅग्ज, तीन-पॉइंट सीट बेल्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), EBD सह ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा इत्यादीसह सुरक्षा फीचर्ससुद्धा उपलब्ध असणार आहेत.
किंमत :
एंट्री-लेव्हल ट्रिमसाठी किंमत आठ लाख रुपयांपासून सुरू होईल ते टॉप-ऑफ-द-लाइन ट्रिमसाठी १४ लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) किंमत असेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.