Discount on Skoda kushaq and slavia : दिवाळी निमित्त अनेक कार कंपन्यांनी आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली आहे. आलिशान कार निर्मिती कंपनी स्कोडाने आपल्या फ्लॅगशिप कुशाक एसयूव्ही आणि स्लाविया सेडान कारवर सूट दिली आहे. स्कोडा कुशाक ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून स्लाविया ही एक मिड साइज सेडान कार आहे. मोठ्या बचतीसह ग्राहकांना या दमदार कार घेण्याची संधी मिळत आहेत.
या वर्षीच्या सुरुवातीला लाँच झाल्यानंतरच स्कोडा स्लावियाने अनेक मोठ्या कार्सना आव्हान दिले होते. ह्युंडाई सिटी, फॉक्सवेगन व्हर्च्युस या सिडान कार्सना ती टक्कर देत आहे. कुशाक आणि स्लावियावर सूट मिळत आहे, मात्र, कंपनीने ऑक्टाविया, सुपर्ब आणि कोडियाक सरख्या इतर मॉडेल्सवर सूट दिलेली नाही.
(ही कार आल्टोपेक्षाही छोटी, फूल चार्जमध्ये २४० किमीची मिळते रेंज, जाणून घ्या किंमत आणि फीचर)
कुशाकवर हजार रुपयांची बचत
कुशाकवर मोठी ऑफर देण्यात आली आहे. कंपनीने कुशाकवर ३० हजार रुपयांची सूट दिली आहे. यात १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १५ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. त्याचबरोबर, कंपनी कुशाक घेणाऱ्या ग्राहकांना चार वर्षांपर्यंतचा कॉम्प्लिमेंट्री सर्व्हिस पॅकेज देखील ऑफर करत आहे.
सर्वात सुरक्षित कार
स्कोडा कुशाक ही अधिकृतरित्या देशातील सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार ठरली आहे. अलिकडेच एसयूव्हीने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळवले आहे. कुशाकला प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसंबंधी चाचणीमध्ये ही रेटिंग मिळाली आहे. स्कोडा कुशाक ही ग्लोबल एजेन्सीमध्ये सर्वात अधिक सुरक्षा रेटिंग मिळवणारी पहिली भारतीय एसयूव्ही कार ठरली आहे.
(महामार्गावर प्रवास करताना ‘हा’ क्रमांक लक्षात ठेवा, अपघातात आणि इतर संकटात मिळेल मदत)
स्लावियावर इतक्या रुपयांची सूट
कंपनी स्लावियावरही २५ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे. कंपनी स्लावियावर १५ हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि १० हजार रुपयांपर्यंतचे लॉयल्टी बोनस किंवा कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहे. कुशाकप्रमाणे स्लावियावरही ग्राहकांना चार वर्षांपर्यंतचा कॉम्प्लिमेंट्री सर्व्हिस पॅकेज ऑफर केला जात आहे.