स्कोडा स्लाव्हिया सेडान कंपनीने आज १.० TSI आवृत्ती भारतीय बाजारात लॉंच करण्यात आली आहे. ज्याची किंमत १०.६९ लाख ते १५.३९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याशिवाय स्कोडा ३ मार्च रोजी १.५ TSI आवृत्तीच्या किमती जाहीर करणार आहे. ही नवीन सेडान MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कोडा स्लाव्हिया ही कार अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल या तीन प्रकारांमध्ये लॉंच करण्यात आली आहे. स्कोडा स्लाव्हियाची स्पर्धा न्यू होंडा सिटी, ह्युंदाई वेर्ना आणि मारुती सियाझ यांसारख्या कारशी होईल.

स्पेशल ऑफर

कंपनी या कारसाठी खास ऑफरही देत ​​आहे. ज्यासाठी स्कोडा कंपनी तुम्हाला चार वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेज देत आहे. या पॅकेजमध्ये स्लाव्हियाचा देखभाल खर्च फक्त ०.४६ पैसे/किमी असेल.

वैशिष्ट्ये

स्कोडा स्लाव्हियाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला १६-इंच अलॉय व्हील, लांब व्हील बेस, व्हर्टिकल क्रोम फ्रंट ग्रिल, एल-आकाराचे हेडलाइट्स आणि रुंद एअर इनलेटसह बंपर देण्यात आले आहेत. स्कोडा स्लाव्हियाला प्रीमियम कंपनीकडून मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ऑटो हेडलॅम्प, ६ स्पीकर मिळतात. या कारमध्ये तुम्हाला सुरक्षेसाठी ६ एअरबॅग पाहायला मिळतील. याशिवाय क्रूझ कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरासह अनेक मानक आणि सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

इंजिन

स्कोडा स्लाव्हियाच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात १.०लिटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे ज्याची किंमत आज जाहीर करण्यात आली आहे. हे इंजिन ११५PS पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. दुसरीकडे, दुसऱ्या पर्यायामध्ये १.५लीटर ४ सिलेंडर TSI इंजिन आहे, ज्याची किंमत ३ मार्च रोजी घोषित केली जाईल. हे १५०PS पर्यंत पॉवर आणि २५०Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात तुम्हाला ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.