स्कोडा इंडियाने नेहमीच चांगल्या गाड्या भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. कंपनीने ऑक्टाव्हियासह भारतात प्रवेश केला ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. लॉरा, सुपर्ब आणि रॅपिड सारखी तीन मॉडेल्स बाजारात आणले. सेडान मॉडेल्स कंपनीची जमेची बाजू आहे. नुकतीच कंपनीने स्कोडा स्लॅविया भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. स्कोडा स्लॅवियासाठी प्री-बुकिंग आता सुरू आहे. स्लॅवियाची होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ, आणि ह्युंदई वर्ना या गाड्यांशी स्पर्धा असेल. गाडी खरेदी करण्यापूर्वी नवीन स्कोडा स्लॅविया सेडानबद्दल माहिती जाणून घ्या.

डिझाइन आणि स्टाइल
स्लॅवियाचा डिझाइन आणि स्टाइल सर्वोत्तम असून आकर्षक आहे. फ्रंटला सिग्नेचर बटरफ्लाय ग्रिल आणि क्रोम देण्यात आला आहे. यामध्ये हॅलोजन बल्ब वर्तुळाकार फॉग लाइट्समध्ये देण्यात आला आहे. त्याच्या जवळ एक उलटा एल-आकाराचा एलिमेंट देण्यात आला आहे. बोनेटवर काही कॅरेक्टर लाइन दिसतात, ज्यामुळे या सेडानला मस्क्यूलर लूक मिळतो, तसेच ते दिसायला आकर्षक बनवते. स्लॅवियाच्या बाजूच्या भागात अधिक कॅरेक्टर लाईन दिसतात. विंडो लाइन क्रोममध्ये ठेवली जाते आणि सी-पिलरजवळ बूमरँग आकारात संपते. दरवाजाच्या हँडलमध्येही क्रोम दिसत आहे. यासह, छताला मागील बाजूस उतार आहे आणि ते स्पोर्टी लुक देते. यात शार्क फिन अँटेना देखील आहे. स्कोडा स्लॅवियाला १६ इंच चाके आहेत. टोर्नेडो रेड, कँडी व्हाइट, कार्बन स्टील, रिफ्लेक्स सिल्व्हर, क्रिस्टल ब्लू अशा पाच रंगात ही गाडी येते. स्कोडा स्लॅवियाचे अॅक्टिव्ह, एम्बिशन, स्टाइल असे तीन व्हेरियंट आहेत. स्कोडा कार त्यांच्या आलिशान आणि आरामदायी इंटीरियरसाठी ओळखल्या जातात आणि स्लॅविया यापेक्षा वेगळी नाही. तुम्ही दरवाजा उघडताच, तुम्हाला एक प्रशस्त, ड्युअल टोन इंटीरियर मिळेल. तुम्हाला लगेच प्रीमियम कारमध्ये बसल्यासारखे वाटते. स्कोडा स्लॅविया हे ट्रंक असलेल्या युरोपियन स्कोडा फॅबियासारखे दिसते.

चेसिस, इंजिन आणि स्पेसिफिकेशन
स्कोडा स्लाव्हिया कंपनीच्या MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. कंपनीच्या India 2.0 योजनेअंतर्गत लॉन्च होणारे दुसरे उत्पादन आहे. हे जागतिक प्लॅटफॉर्मवर आधारित मॉडेल आहे जे भारतीय बाजारपेठेसाठी कस्टमाइज केले गेले आहे. त्यामुळे अनेक भागांची देवाणघेवाण केली जाऊ शकते. स्कोडा कुशकमधून इंजिन आणि गिअरबॉक्स घेतले गेले आहेत. सेडानमध्ये तुम्हाला दोन इंजिन आणि तीन गिअरबॉक्स पर्याय मिळतात. स्कोडा स्लॅवियामध्ये १.० लिटर टर्बो-पेट्रोल आणि १.५ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. त्याचे १.० लिटर तीन सिलेंडर इंजिन ५००० rpm वर ११३.५ bhp पॉवर आणि १७५० आणि ४५०० rpm दरम्यान १७८ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मोठे इंजिन असल्याने अधिक शक्तिशाली आहे. हे चार-सिलेंडर, १.५-लिटर इंजिन आहे जे ५००० rpm वर १४८ bhp आणि १५०० rpm वर २५० Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड DSG गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन उत्कृष्ट काम करते.

कम्फर्ट आणि बूट स्पेस
स्कोडा स्लॅवियाची सर्व सीट्स छिद्रित आहेत. समोरच्या दोन्ही सीटला व्हेंटिलेशन फीचर देखील मिळते. कारच्या सीट्स जास्त काळ टिकण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. मागील भाग देखील बराच प्रशस्त आहे. सेडानचा व्हीलबेस २,६५१ मिमी आहे. स्लॅवियामधील प्रवाशांना भरपूर लेगरूम आणि गुडघ्याची खोली देखील मिळते. स्कोडा स्लॅवियाची रुंदी १,७५२ मिमी आहे. यामुळे, कारच्या दुसऱ्या रांगेतील सीटवर तीन लोक आरामात बसू शकतात. स्टोरेज स्पेसच्या बाबतीत स्कोडा स्लॅविया चांगली आहे. हे मागील प्रवाशांसाठी सीटवर फोल्ड-डाउन आर्मरेस्ट देखील मिळते आणि कपहोल्डर देखील मिळते. डॅशबोर्डमध्ये एक लहान स्टोरेज स्पेस आहे आणि सेंटर कन्सोल, डोअर पॉकेट्समध्ये स्टोरेज स्पेस आहे. स्कोडा स्लॅवियामध्ये ५२१ लीटरची बूट स्पेस आहे. बूट स्पेस १,०५० लिटरपर्यंत वाढवण्यासाठी मागील सीट खाली दुमडली जाऊ शकते. मोबाईल फोनसाठी वायरलेस चार्जिंगचा पर्याय देखील आहे.

सेफ्टी फिचर्स
स्कोडा स्लॅवियाला सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम बनवण्यासाठी कंपनीने कोणतीही कसर सोडली नाही. सुरक्षिततेच्या बाबतीत, स्लॅवियापेक्षा महाग असलेल्या गाड्यांशी स्पर्धा करते. सहा एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, टॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशिअलसह अँटी स्लिप रेग्युलेशन आणि मोटर स्लिप रेग्युलेशन, रोलओवर प्रोटेक्शन आणि आयएसओफिक्स सीट आहेत.स्कोडा ऑटो इंडियाचे म्हणणे आहे की ते सेडान सेगमेंटला लक्ष्य करत आहे कारण पुढील काही महिन्यांत त्यांच्या विक्रीत जवळपास १३८ टक्क्यांनी वाढ होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनी विक्रीच्या आघाडीवर देखील उत्साही आहे.

Story img Loader