Electric SUV: इंधनाचे दर सातत्यानं वाढत असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक कार खरेदीकडे वळत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जवळपास सर्वच कार कंपन्या इलेक्ट्रिक कारची नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी येत्या १२ महिन्यांत किमान तीन ते पाच नवीन उत्पादने लाँच करण्याचा विचार करत आहे. इतकेच नाही तर स्कोडा एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखील विकसित करत आहे, जी २०२५ पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीला लाँच करण्यापूर्वी, स्कोडा आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Skoda Enyaq iV, नवीन शानदार सेडान आणि मर्यादित एडिशन ऑक्टाव्हिया RS iV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही मॉडेल्स बहुधा CBU किंवा CKD युनिट्स म्हणून ऑफर केली जाण्याची शक्यता आहे. Enyaq iV सह, Skoda चे उद्दिष्ट देशाच्या इलेक्ट्रिक विभागात प्रवेश करण्याचे आहे. हे २०२३ च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : Hyundai Motor: भारतात लवकरच लाँच होणार Hyundai ची EV Ioniq 5; जाणून घ्या फीचर्स…
Skoda Enyaq iV चे फीचर्स
भारतात स्कोडा टॉप-स्पेक Enyaq iV 80X लाँच करू शकते, जी ७७ kWh बॅटरी पॅकसह येते आणि १२५kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ही कार ड्युअल मोटरसह येते. यात प्रत्येक एक्सलवर एक AWD (ऑल-व्हील-ड्राईव्ह) सेटअप आणि एकूण २६५ bhp ची पावर मिळते. या इलेक्ट्रिक एसयूव्ही बद्दल कंपनीचा दावा आहे की ही फक्त ६.९ सेकंदात ०-१०० ताशी वेग गाठू शकते. हा मॉडेल ५१३ किमी पर्यंतच्या WLTP रेटेड रेंजसह येतो, ज्यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात जास्त रेंज देणारी ईव्ही बनू शकते.
Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही १९-इंच प्रोटियस अलॉय व्हील्स, १३-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, अॅम्बिएंट लाइटिंग, लेदर-रॅपिड स्टीयरिंग व्हील आणि अपहोल्स्ट्रीसह बाजारात येईल. ज्यात लेदर आणि मायक्रोफायबर फॅब्रिकचं मिश्रण आहे. स्कोडा इलेक्ट्रिक एसयूव्ही कमी किंमतीत सादर करण्यासाठी कंपनी लो-स्पेक, टू-व्हील ड्राईव्ह मॉडेल देखील सादर करू शकते. स्कोडा Enyaq iV वोक्सवॅगन समूहच्या MEB born electric platform वर आधारित आहे. प्लॅटफॉर्म सिंगल-मोटर, RWD आणि ड्युअल-मोटर AWD सेटअपसह कॉम्पिटेबल आहे, दोन्ही Enyaq iV सह उपलब्ध आहेत.