Tips To Drive In The Fog : दिल्लीत प्रचंड थंडी आहे. तापमानात घट झाल्यामुळे दाट धुक्याने विविध भागांना वेढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, कमी दृश्यमानतेमध्ये वाहन चालविण्याशी संबंधित समस्यांचा वाहनचालकांना त्रासही होऊ लागला आहे. त्यामुळे थंडीत धुक्यामध्ये अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना प्रत्येक वाहनचालकाने काळजी घेणे आवश्यक आहे (Smart Driving Tips). तर अशा हवामानाच्या परिस्थितीत नेव्हिगेट करण्यात तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने सुरक्षित वाहन चालवण्याबाबतच्या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्या खालीलप्रमाणे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी हळू चालवा

कमी दृश्यमानता असलेल्या मार्गावर वाहन चालवताना, चालकांनी सावधगिरीने पुढे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ॲक्सिलेटर सांभाळत वेग यांवर नियंत्रण ठेवावे (Smart Driving Tips). हा दृष्टिकोन रस्त्यावरील संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ प्रदान करतो.

रोड मार्किंगला फॉलो करा

दाट धुक्यातून चालकांना मदत करण्यासाठी रस्ते अनेकदा पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषांनी चिन्हांकित केले जातात. त्यामुळे मार्गिकेची योग्य स्थिती राखण्यास मदत मिळू शकते. नेव्हिगेशनसाठी दुसऱ्या वाहनाचे अनुसरण करणे सामान्यतः कमी प्रभावी ठरू शकते.

लो बीम वापरा

धुक्यातून वाहन चालवताना चालकांना हाय बीमचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण- धुक्यातील ओलाव्यामुळे आणि त्यात हेडलाइट्स हाय बीमवर ठेवल्याने दृश्यमानता आणखी बिघडते आणि डोळ्यांसमोर चमक निर्माण होते. त्याऐवजी दाट धुक्यातून दृश्यमानता वाढवण्यासाठी चालकांनी कमी बीम किंवा फॉग लाइट्सचा वापर करावा (Smart Driving Tips).

हेही वाचा…Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

डीफॉगर वापरा

हिवाळ्यात विंडशिल्ड्सवर ओलावा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे चालकाच्या समोरचे दृश्य पाहण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. विंडशील्ड वायपर वापरल्याने विंडशील्ड्सवरील ओलावा साफ होण्यास मदत होते. डीफॉगर आतून कंडेन्सेशन काढून टाकू शकतो.

ओव्हरटेक करू नका

दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करणे टाळा (Smart Driving Tips). तसेच आवश्यकतेनुसार तुमची आणि समोरची गाडी यांच्यात सुरक्षित अंतर राखा.

अचानक सिग्नल देऊ नका

तीक्ष्ण वळणे आणि अचानक थांबणे आदी गोष्टींपासून चालकांनी जागरूक राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे इतर चालकांना तुमच्या गाडी चालविण्यासंबंधीच्या क्रियांची माहिती देण्यासाठी वळण घेण्यापूर्वी वळण सिग्नल सक्रिय करणे महत्त्वाचे आहे. तसेच, त्यांना योग्य प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ द्या.

पादचाऱ्यांपासून अंतर राखा

लाईट्स आणि रिफ्लेक्टरमुळे समोरची वाहने पाहणे तुलनेने सोपे असले तरी दाट धुक्यात पादचारी किंवा सायकलस्वार दिसणे खूपच आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी सतर्क राहून पादचाऱ्यांवरसुद्धा लक्ष ठेवावे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart driving tips to driving in fog here is your ultimate guide to drive in the fog and be safe asp