Renault Triber भारतातील सर्वात स्वस्त तीन-पंक्ती सात-सीटर एमपीव्ही पैकी एक आहे. या गाडीने विक्रीचा एक मोठा टप्पा पार केला आहे. जून, २०१९ मध्ये लॉन्च झाल्यापासून त्यांनी ट्रायबर एमपीव्हीच्या एक लाखाहून अधिक युनिट्सची भारतात विक्री केली आहे, असं फ्रेंच कार निर्मात्याने सांगितलं आहे. रेनॉल्ट ट्रायबर सात-सीटर एमपीव्ही सध्या ५.७६ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत विकली जाते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचण्यांमध्ये सर्वात सुरक्षित कार म्हणून गाडीला चार-स्टार रेटिंग मिळाले आहेत.
रेनॉल्ट ट्रायबर एमपीव्ही चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात RXE, RXL, RXT आणि RXZ स्पेक मॉडेल्सचा समावेश आहे. नवीन ट्रायबरमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल आणि टेक अपडेट्स केले गेले आहेत. तर सुरक्षेच्या बाबतील मागील मॉडेलसारखीच आहे. कंपनीनेने ७.२४ लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लिमिटेड एडिशन मॉडेल देखील लाँच केलं आहे. आजपासून या मॉडेलची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. रेनॉल्ड ट्रायरबर लिमिटेड एडिशन RXT प्रकारावर आधारित आहे. हे १.०-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे मॅन्युअल आणि Easy-R AMT ट्रान्समिशनसाठी जोडलेले आहे. रेनॉल्ट ट्रायबर LE नवीन अकाझा फॅब्रिक अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक फिनिशसह ड्युअल-टोन डॅशबोर्ड, संपूर्ण डिजिटल व्हाइट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रोम रिंगसह HVAC नॉब्स आणि आतील दरवाजा काळ्या हँडल्ससह येते.
ट्रायबर LE मूनलाइट सिल्व्हर आणि काळ्या छतासह सीडर ब्राऊन सारख्या ड्युअल टोन रंगासह येते. नवीन १४ इंच फ्लेक्स व्हीलच्या सेटवर उभे राहील. सुरक्षेचा विचार करता, नवीन ट्रायबर प्रकारात चार एअरबॅग्ज आहेत. ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांसाठी समोर आणि बाजूला एअरबॅग्ज देण्यात आल्यात. लिमिटेड एडिशन ट्रायबरमध्ये स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्ससह सहा-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि दिशानिर्देशांसह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील आहे.