Porche Car Accident: गुरुग्राममध्ये गुरुवारी एका आलिशान कारला अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी सकाळी गोल्फ कोर्स रोडवरील आहे. या भरधाव वेगात असलेल्या पोर्चे कारने झाडाला धडकून पेट घेतला. काही क्षणात कार जळून राख झाली. विशेष म्हणजे, झाडाला धडकण्यापूर्वी कार दुभाजकालाही धडकली. घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एएनआय या वृत्तसंस्थेवर कारची बातमी पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही लोक मारुती तर काही टाटा नॅनोला पोर्शपेक्षा चांगले सांगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाल रंगाची पोर्श कार पूर्णपणे खराब झाल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. या लक्झरी स्पोर्ट्स कारची किंमत सुमारे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कार गोल्फ कोर्स रोडवरील सेक्टर ५६ वरून येत होती आणि सिकंदरपूरकडे जात होती. सेक्टर २७ मध्ये दुभाजकाला धडकून सर्व्हिस लेनवर पडला. सर्व्हिस लेनवर पडल्यानंतर वाहन झाडावर आदळले आणि बाजूला पडले आणि बाजूला जाताच अचानक पेट घेतला. ही पोर्श जर्मनी ९११ आहे, जी एक स्पोर्ट्स कार आहे. त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे.

(हे ही वाचा : देशात दाखल झाली ८ गिअर असलेली ‘सुपरफास्ट’ Sporty SUV कार, ४.९ सेंकदात १००KM स्पीड, ५ लाख देऊन होईल तुमची )

लोकांनी दिली प्रतिक्रिया

फोटो पाहून लोक या कारपेक्षआ टाटा नॅनो बरी, अशा प्रतिक्रिया देत आहेत.  या कारची अवस्था पाहून लोक आता सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, “मारुती ही देशाची शान असती तर प्रत्येकाला त्यांच्या सुरक्षा मानकांची माहिती मिळाली असती. पण पोर्श असेल तर कोणी काही बोलत नाही.”

दुसर्‍या यूजरने लिहिले, “लज्जास्पद, जर TATA असता तर एक ओरखडाही आला नसता!! उलट झाडच तोडून जळून राख झाले असते.” तिसर्‍या व्यक्तीने लिहिले की, “नॅनो असती तर काहीही झाले नसते.”

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speeding luxury car caught fire and burned to ashes after hitting a tree at golf course road in gurugram pdb