एस१ इलेक्ट्रिक स्कूटरच्या पाठोपाठ आता OLA नवी कोरी इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार असल्याचे संकेत ओलाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून दिले आहेत. 15 ऑगस्ट रोजी नवीन उत्पादनाची घोषणा करताना खूप उत्सुक आहे. आमच्या भविष्यातील मोठ्या योजनांबद्दल अधिक शेअर करू. अशा आशयाचे ट्विट अग्रवाल यांनी केले आहे. दरम्यान या घोषणेनंतर ओलाची नवी इलेक्ट्रिक कार कशी असेल याविषयी अनेकांनी अंदाज बांधले आहेत. या EV चे संभाव्य फीचर्स व लुकविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठरलं! SUV Hyundai Tucson 10 ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्य व किंमत

ओला इलेक्ट्रिक कारचे संभाव्य फीचर्स

  • कारच्या प्रत्येक चाकावर एक मोटर असू शकते आणि याला सुमारे ६०-८० केडब्ल्यूएच क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.
  • मोठ्या बॅटरी पॅकमुळे, ही कार ५०० किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते
  • कारचा टॉप स्पीड १५० किमी/ता पेक्षा जास्त असू शकतो.
  • सीईओ अग्रवाल यांच्या माहितीनुसार ओलाची नवी कार ही सध्याच्या बाजारातील आतापर्यंतची सर्वात sportiest लुकची गाडी असेल.
  • मॉडर्न टायर डिझाईन व काचेचे छप्पर असे काही फीचर्स सुद्धा ओलाच्या नव्या कार मध्ये समाविष्ट असतील.
  • या सर्व फीचर्स सह ओला आपल्या इलेक्ट्रिक कारच्या सुरक्षेबाबत काय मोठे पाऊल उचलणार हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे.

जूनच्या सुरुवातीला, ओला फ्युचर फॅक्टरी येथे ओला ग्राहक दिनादरम्यान ओला इलेक्ट्रिकने आपल्या आगामी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाची एक झलक दाखवली होती. ओला इलेक्ट्रिकने केंद्रासोबत PLI योजनेवरही स्वाक्षरी केली आहे, ज्यानुसार EV निर्माते भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी तयार करण्यासाठी लिथियम-आयन सेलवर काम करू शकतात.

दरम्यान, ओला सध्या त्यांच्या EV चारचाकी कारखान्यासाठी सुमारे 1,000 एकर जमीन संपादित करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास ते त्याच्या Future factory च्या जवळपास दुप्पट आकाराचे असेल, जिथे सध्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली जाते.