भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर कार निर्मात्यांनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये टाटा मोटर्स व्यतिरिक्त, MG मोटर्स, महिंद्रा, BMW आणि Audi सारख्या कंपन्यांच्या कारची संख्या सर्वाधिक आहे.
भारतात इलेक्ट्रिक कारला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे, परंतु बऱ्याचदा जास्त किंमतीमुळे लोक या कार खरेदी करू शकत नाहीत. जर तुम्हीही बजेटच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकत नसाल, तर भारतातील सर्वात कमी किमतीच्या दोन सीटर इलेक्ट्रिक कारची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
इथे आम्ही स्ट्रॉम मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक स्टार्ट अप इलेक्ट्रिक कार स्ट्रॉम आर3 बद्दल बोलत आहोत जी तीन चाकी दोन सीटर कार आहे. ही Storm R3 ही अतिशय छोटी कार आहे ज्याला कंपनीने दोन दरवाजे दिले आहेत.
आणखी वाचा : बजेट कमी आहे पण हॅचबॅक कार घ्यायचीय? मग अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Renault Kwid, वाचा ऑफर
या कारचे एकूण वजन ५५० किलो आहे. त्याच्या डायमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ते २,९०७ मिमी लांब, १,४०५ मिमी रुंद आणि १,५७२ मिमी उंच केले आहे. ज्यासह १८५ मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.
Strom R3 चार्जिंगच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यात १३ kW Lithium Ion बॅटरी पॅक सोबत १५ kW पॉवर मोटर दिली आहे.
ही मोटर २०.४ PS पॉवर आणि ९० Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये बसवलेल्या बॅटरीच्या चार्जिंगबद्दल कंपनीचा दावा आहे, सामान्य चार्जरने चार्ज केल्यानंतर ती ३ तासांत पूर्णपणे चार्ज होते.
Strom R3 Range : Strom R3 च्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ८० kms प्रति तासाच्या टॉप स्पीडसह २०० kms ची ड्रायव्हिंग रेंज देते. या कारमध्ये कंपनीने तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत ज्यात पहिला इको मोड, दुसरा नॉर्मल मोड आणि तिसरा स्पोर्ट्स मोड आहे.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने कीलेस एंट्री, पॉवर विंडो, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉईस कमांड, क्लायमेट कंट्रोल, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स दिले आहेत.
Strom R3 किंमत किंमतीबद्दल बोलायचे तर, कंपनीने याची सुरुवातीची किंमत ४.५० लाख रुपये आहे आणि ही एक्स-शोरूम किंमत देखील त्याची ऑन-रोड असतानाची किंमत आहे.