Traffic car driving: काही जण ऑफिसला जाण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी कारचा वापर करतात. मोठमोठ्या शहरांतील रस्त्यांवर काही ठराविक वेळेत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. एकदा या ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली की, तासनतास वाया जातात. तसेच बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये कशी गाडी चालवायची हेदेखील अनेकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना त्रास होत असल्यास काय काळजी घ्यावी हे सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रॅफिकमध्ये घ्या या गोष्टींची काळजी

ऑफिसला किंवा घरी जाताना बराच वेळ गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर अनेकदा चालक आक्रमकपणे वागतो, त्यामुळे अपघात आणि वादाचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यावेळी तुम्ही गाडीमध्ये बसून आवडीची गाणीही ऐका, चित्रपट पाहा किंवा पुस्तक वाचा.

जर तुम्हाला ट्रॅफिक आणि गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवताना त्रास होत असेल तर प्रवास सुरू करण्यापूर्वीच तुम्ही गूगल मॅप वापरू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तेथे किती रहदारी आहे, याची माहिती नकाशाच्या माध्यमातून मिळते. असे केल्याने तुमची ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याच्या त्रासापासून सुटका होईल.

काही लोक ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना सतत लेन बदलतात. लेन बदलल्याने अपघाताचा धोका वाढतो. म्हणून जेव्हा तुम्ही तुमची गाडी ट्रॅफिकमध्ये चालवता, तेव्हा नेहमी गाडी एकाच लेनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि इतर गाड्यांचेही नुकसान होणार नाही.

बऱ्याच नवीन कारमध्ये कंपन्यांकडून उत्तमोत्तम फीचर्स दिले जातात. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ३६० डिग्री कॅमेरा. या वैशिष्ट्यामुळे ट्रॅफिकमध्ये आपले वाहन चालविणे तुमच्यासाठी सोपे होईल. ट्रॅफिकमध्ये ३६० डिग्री कॅमेरा सुरू केल्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे शक्य असल्यास तुम्ही तुमची गाडी स्क्रॅच किंवा नुकसान न करता चालवू शकता.

गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर शांत राहून आजूबाजूच्या गाड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून ट्रॅफिक सुटल्यावर अपघात होणार नाही.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stuck in traffic every day then follow these simple tips sap