Car AC Tips: जर तुम्ही उन्हाळ्यात दररोज गाडी चालवत असाल, तर गाडीत एअर कंडिशनर बसवणे खूप महत्त्वाचे आहे. नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांत गाडी चालवताना जास्त उष्णता जाणवू शकते किंवा गुदमरल्यासारखे होऊ शकते. अशा समस्येतून जावे लागू नये म्हणून तुम्ही कार एअर कंडिशनरशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्सचे पालन केले पाहिजे.

उन्हाळ्यात कार चालवताना ‘या’ टिप्स करा फॉलो

  • जर तुम्ही तुमची गाडी सावलीत पार्क केली, तर गाडीतील तापमान कमी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे एअर कंडिशनरवर जास्त दबाव पडत नाही आणि तुमच्या गाडीची केबिन काही वेळातच थंड होते.
  • कारचे एअर कंडिशनर री-सर्क्युलेशन मोडवर सेट केले पाहिजे. असे केल्याने, एअर कंडिशनर तुमच्या कारमध्ये निर्माण झालेली थंड हवा री-सर्क्युलेट करते आणि केबिन थंड राहते.
  • एअर कंडिशनर पूर्ण क्षमतेने चालू ठेवू नका. कारण- त्यामुळे एअर कंडिशनरवर दबाव तर येतोच; पण गरजेपेक्षा जास्त इंधनदेखील लागते.
  • एअर कंडिशनर फिल्टर खूप लवकर घाण होतो. अशा परिस्थितीत एअर कंडिशनरचा सतत वापर केल्यानंतर, तो फिल्टर बदलायला विसरू नका. त्यामुळे एसीवर दबाव येत नाही आणि कारचे केबिनदेखील चांगल्या रीतीने थंड होते.
  • कारच्या खिडक्यांवरील शेड्स आजकाल खूप लोकप्रिय आहेत. त्या शेड्स बसवून घ्या. त्यामुळे तुम्ही एअर कंडिशनरचा वापर कमी करून, कार थंड ठेवू शकता.
  • एअर कंडिशनर थेट पूर्ण क्षमतेने चालू करू नका. त्याऐवजी त्याचे तापमान हळूहळू कमी करा, त्यामुळे एअर कंडिशनर चांगले काम करते आणि कारची केबिन व्यवस्थित थंड होते.
  • एअर कंडिशनर चालू केल्यानंतर, त्याचे व्हेंट्स योग्य दिशेने आहेत ना हे पाहिले पाहिजे. त्यामुळे तुमची संपूर्ण कार लवकर थंड होण्यास मदत मिळेल.