Sunny Deol Buys Range Rover Autobiography : सनी देओलला महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्या या छंदाची आवड लक्षात घेता आता त्यांनी नवी कोरी रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्हीसुद्धा खरेदी केली आहे. अलीकडेच, अभिनेता मुंबईच्या रस्त्यावर त्याच्या नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्हीसह दिसला, ज्याची किंमत जवळजवळ ३ कोटींहून अधिक आहे.

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता सनी देओलची नवीन रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्ही ही लक्झरी आणि पॉवरचा कॉम्बो म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. भारतापासून जगभरातील कलाकारांना या पॉवरफूल एसयूव्हीची बरीच क्रेझ आहे, ती सोशल मीडियापासून ते अगदी चित्रपटांपर्यंत ही एसयूव्ही तुम्हाला दिसून येईल.

लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अनेक गोष्टी देते. एसयूव्ही केबिनमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. मसाज फंक्शनसह, थंड केलेल्या फ्रंट सीट्स, १३.२ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पिवी प्रो ऑपरेटिंग सिस्टम, मोठा डिजिटल ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, इतर फीचर्समध्ये वायरलेस ॲड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्ट, 4 झोन क्लायमेट कंट्रोल, व्हॉईस कमांड, हेड-अप डिस्प्ले, डिजिटल ऑडिओ ब्रॉडकास्ट, प्रीमियम मेरिडियन साउंड सिस्टम आणि बरेच काही समाविष्ट आहे.

लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीच्या इंजिन आणि पॉवरबद्दल सांगायचे तर त्यात अनेक इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. सनी देओलने खरेदी केलेल्या व्हेरिएंटमध्ये 3.0 लिटर P400 इंजेनियम टर्बोचार्ज्ड इनलाइन, 6 माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे, जे 394 एचपी पॉवर आणि 550 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. यात 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, जे सर्व चार चाकांना पॉवर पाठवते. पॉवरफुल आणि जड असूनही ही एसयूव्ही केवळ ५.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवते.

तर सनी देओलकडे अनेक कार आहेत, ज्यात पोर्श 911 GT3 टूरिंग, लँड रोव्हर डिफेंडर तसेच जीप मेरिडियन, फोक्सवॅगन टिगुआनसारख्या कार आहेत. आता सनी देओल त्याच्या नवीन रेंज रोव्हरसह दिसणार आहे.

Story img Loader